नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, या परीक्षेतही मुलींनी ९६.३६ उत्तीर्ण टक्केवारीसह मुलांना मागे टाकले आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.११ टक्के आहे. देशभरात १,६८,५४१ विद्यार्थ्यांनी संपूर्ण १० सीजीपीए प्राप्त केला असून, यामध्ये ८५,३१६ मुले व ८३,२२५ मुलींचा समावेश आहे. सीबीएसई दहावीच्या निकालात यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांची एकूण टक्केवारी ९६.२१ राहिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १.११ टक्का कमी आहे. गेल्या वर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.३२ टक्के होते. तर एकूण ९४,४७४ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए मिळविला होता. (वृत्तसंस्था)राज्यात घवघवीत यशमुंबई : सीबीएसईच्या दहावीच्या निकालात महाराष्ट्राने बाजी मारली असून, राज्यातील ४३ हजार ३३० विद्यार्थ्यांनी (९९.६८ टक्के) त्यात यश मिळविले आहे. महाराष्ट्रातून २५ हजार ८७८ मुले तर १७ हजार ५९३ मुली सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ९९.६१ टक्के मुलांनी परीक्षेत यश मिळविले, तर ९९.७८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मला एरोस्पेस इंजिनीअर व्हायचे आहे. त्यासाठीचा अभ्यास सुरू केला आहे, अशी प्रतिक्रिया ९७ टक्के मिळवत आर्यगुरूकुल शाळेच्या अभिषेक राधाकृष्णन याने दिली. मला अंतराळाची विशेष आवड आहे. त्यातच करिअर करण्याची इच्छा आहे, असे शंतनु पाठक हा ९५ टक्के गुण मिळवलेला विद्यार्थी म्हणाला. मला मेडिकलमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे ऋत्विक जैन या ९६.४० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले.तिरुअनंतपुरम अव्वलतिरुअनंतपुरम क्षेत्र अव्वल राहिले असून, येथील ९९.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ चेन्नईची कामगिरी राहिली असून, या क्षेत्रात उत्तीर्णांची टक्केवारी ९९.६९ एवढी आहे. यंदा १४,९१,२९३ विद्यार्थी सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते. पूजा, सत्यजीतला १००%नांदेड येथील ग्यानमाता इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी पूजा प्रशांत दिग्रसकर हिने ‘सीबीएससी’ पॅटर्न अंतर्गत १० सीजीपीए म्हणजेच १०० टक्के गुण मिळविले. राज्यातील निकालात मुलींचा आलेख उंचावला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील सत्यजीत कदम यानेही १०० टक्के गुण मिळविले आहेत.मुंबई विभागात अस्मिता अव्वल सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेतील अस्मिता जैन या विद्यार्थिनीने ९९.६0 टक्के गुण मिळवून, मुंबई विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
दहावीतही गर्ल्स शायनिंग
By admin | Published: May 29, 2016 4:14 AM