Shraddha Murder Case: काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर हत्याकांडावरून संपूर्ण देश हादरला होता. आफताबने प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करून ३५ तुकडे केले होते. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी आरोपी असलेल्या आफताबची कसून चौकशी केली. या प्रकरणात पोलीस यंत्रणा, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच श्रद्धाच्या कुटुंबाकडून अनेक खुलासे करण्यात आले. यानंतर आता पोलिसांनी आणखी एक नवा खुलासा केला आहे. पोलिसांनी चार्जशीट दाखल केली असून, आफताबने हत्येनंतर श्रद्धाचा चेहरा ब्लो टॉर्चने बिघडवण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या चार्जशीटमध्ये आफताबचा कबुली जबाब देण्यात आला आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन-चार महिन्यांनी आफताबने ब्लो टॉर्चने तिचा चेहरा आणि केस विद्रूप करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्याची ओळख कोणत्याही परिस्थितीत कळू शकली नसती. यानंतर आफताबने श्रद्धाचे डोके, धड आणि शरीराचे इतर अवयव छतरपूरच्या जंगलात फेकून दिले होते, असे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर श्रद्धाचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या मोबाईलमध्ये लॉग इन केले. त्यानेच इन्स्टाग्रामवर श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडरच्या मेसेजला उत्तर दिले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ७५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते. आफताबची पोलिसांनी नार्को टेस्ट केली होती. याआधी पॉलीग्राफी चाचणीही करण्यात होती. आफताबला अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. यानंतर पोलिसांनी चार्जशीट तयार करण्यात आली.
श्रद्धाचा हाडांची केली पावडर
आफताबने मार्बल कटिंग मिक्सर ग्राइंडरने श्रद्धाची अनेक हाडे बारीक करून पावडर केली. त्याच वेळी, त्याने मृतदेह जाळण्यासाठी आणि बोटे वेगळी करण्यासाठी ब्लो टॉर्चचा वापर केला. त्याचवेळी श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन महिन्यांनी आफताबने तिच्या डोक्याचा काही भाग फेकून दिला होता, असेही चार्जशीटमध्ये म्हटल्याचे सांगितले जात आहे. आफताबने चौकशीदरम्यान श्रद्धाच्या हत्येबद्दल खेद व्यक्त केला होता. तसेच हत्येमागचे कारण छोट्या गोष्टींवरून भांडण असल्याचे सांगितले. हत्येच्या दिवशी मुंबईला जाण्याचा दोघांचा प्लॅन होता. पण अचानक आफताबने तिकिटे रद्द केली. त्यानंतर दोघांमध्ये खर्चावरून भांडण झाले आणि आफताबने श्रद्धाची हत्या केली.
दरम्यान, श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी तब्बल ६६२९ पानांची चार्जशीट दाखल केली. चार्जशीटमध्ये दिल्ली पोलिसांनी श्रद्धा आणि आफताबमधील भांडणाचे मुख्य कारण आफताबची अनेक मुलींशी मैत्री असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची दिल्ली ते दुबईपर्यंतच्या मुलींशी मैत्री होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"