नवी दिल्ली/नालासोपारा : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची पोलिस कोठडी गुरुवारी ५ दिवसांनी वाढवत दिल्लीच्या एका न्यायालयाने शहर पोलिसांना त्याच्या ‘नार्को टेस्ट’ची परवानगी दिली. तसेच क्राइम सीन रिक्रिएट करण्यासाठी पाेलिस त्याला हिमाचल प्रदेशमध्येही नेऊ शकतात.
आरोपी दिशाभूल करत असल्याने पोलिसांनी नार्को टेस्टसाठी परवानगी मागितली होती. या टेस्टमुळे पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मदत होईल. आफताबच्या फ्लॅटवर आढळलेले रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते मानवी रक्त असल्याचे निष्पन्न झाल्यास श्रद्धाच्या वडिलांची डीएनए चाचणी करण्यात येईल. पूनावाला याने कथितरित्या श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला व तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते एक एक करून शहराच्या अनेक भागात फेकून दिले, असा आरोप आहे.
आफताबला फाशीच द्या : डॉ. नीलम गोऱ्हेn श्रद्धा वालकर (वय २७) हिच्या कुटुंबाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी दुपारी भेट घेतली. दरम्यान, कोर्टात लवकरात लवकर खटला चालवून आरोपीला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. n यावेळी श्रद्धाचे वडील पहिल्यांदा मीडियासमोर आले. n पण त्यांनी या प्रकरणावर मला काही बोलायचे नसून मीडियापासून मी लांब बरा आहे, असे उपस्थित पत्रकारांना सांगितले.
बांगलादेशातही पुनरावृत्तीबांगलादेशातील खुलना येथे श्रद्धा वालकरसारखी खुनाची घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित व्यक्तीने प्रेयसीच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे तीन तुकडे करून ते नाल्यात फेकून दिले.कविता असे मृत तरुणीचे, तर अबू बकर असे आरोपीचे नाव आहे. अबूने विवाहित असल्याचे तिच्यापासून लपवून ठेवले होते.