शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मोहाडीत श्रीकृष्ण जन्मोत्सव यात्रेस शनिवारपासून सुरुवात

By admin | Published: September 03, 2015 11:05 PM

मोहाडी : येथे अष्टबाहू गोपालकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाडमल्ल व कानिफनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त, कर्मयोगी एकनाथभाऊ प्रतिष्ठान, मोहाडी आयोजित भागवत वाचन व्याख्यानमाला कीर्तन, उत्सव अशा विविध अंगांनी मोहाडीत (ता. दिंडोरी) श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत असून या यात्रोत्सवाची सुरुवात दि. ५ सप्टेंबरपासून होत आहे.

मोहाडी : येथे अष्टबाहू गोपालकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाडमल्ल व कानिफनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त, कर्मयोगी एकनाथभाऊ प्रतिष्ठान, मोहाडी आयोजित भागवत वाचन व्याख्यानमाला कीर्तन, उत्सव अशा विविध अंगांनी मोहाडीत (ता. दिंडोरी) श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत असून या यात्रोत्सवाची सुरुवात दि. ५ सप्टेंबरपासून होत आहे.
रात्री १२ वा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत आहे. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे काल्याचे कीर्तन होईल. दि. ६ रोजी पहाटे मंत्रजागर पूजा, महाआरती आदि कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर, मोहाड मल्ल मंदिरात होत असून दु. ३ वा. कानिफनाथ महाराजांची मिरवणूक होईल. या पूजेचा मान पुजारी किसन आबा जाधव यांचे हस्ते तर मोहाड मल्ल मंदिरात अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या हस्ते विधिवत महापूजा होईल. ४ वा. बालकुस्ती स्पर्धा, ६ वा. सार्वजनिक दहीहंडी कार्यक्रम होईल, दहीहंडी फोडण्याचा मान श्री बाकेराव मौले यांना देण्यात येतो.
दि. ७ सप्टेंबर रोजी भव्य कुस्ती स्पर्धा भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटू हजेरी लावतात.
चौकट
अष्टबाहू श्रीकृष्णमूर्ती
श्रीकृष्णाची अष्टबाहू मूर्ती भारतात असून अखंड शालीग्रामात कोरलेली आहे.
एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलून धरलेला आहे. दोन हातात गाईंना मुग्ध करणारी मुरली आहे. इतर हातात चक्र, गदा ही आयुधे आहेत. प्रभूच्या चरणकमलाजवळ दोन गोपी असून एक मृदुंग वाजवित आहे व दुसरा सनई वाजवित अहे. प्रभूच्या अंगास कालियाने विळखा घातला असून कानास दंश करीत आहे, सवत्स गाई प्रभूच्या चरणकमलाजवळ आहे. कमरेस लंगोट असून त्यावर दागिना दाखविला आहे.