नवी दिल्ली - संसदेच्या नव्या इमारतीत मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी कामकाज सुरू झाल्यानंतर जुन्या संसद भवनाची दुरुस्ती करून जतन करण्यात येईल. देश - विदेशातील पर्यटकांना भारताच्या संसदीय परंपरेचा परिचय घडेल. नव्या संसद भवनासोबत वापर करता यावा म्हणून या इमारतीची दुरूस्ती करून संसदेशी संबंधित कार्यक्रमांसाठी तसेच पर्यायी वापरासाठी सज्ज केली जाईल. त्यासाठी रिट्रोफिटिंग करण्याचा प्रस्ताव आहे.
सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास योजनेंतर्गत जुन्या संसद भवनाचे संग्रहालयात रुपांतर करून जतन करण्याची योजना आहे. संग्रहालयात रुपांतर झाल्यास पर्यटकांना लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांमध्येही बसता येईल. जु्न्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित मोतीलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नवरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, लाला लाजपत राय, राजीव गांधी, सरोजिनी नायडू, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, वि. दा. सावरकर यांची तैलचित्र लावण्यात आली आहेत.
नव्या संसद भवनाला सहा प्रवेशद्वार असून, गजद्वार, अश्वद्वार आणि गरुड द्वाराचा वापर उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान करतील. मकरद्वार, शार्दूलद्वार आणि हंसद्वाराचा वापर खासदार आणि सर्वसामान्य नागरिकांना करता येईल.
संसद भवनात मोदी सरकारचे निर्णय...जम्मू आणि काश्मीर कलम ३७० हटविलेजीएसटी- एक देश एक करप्रणालीवन रँक, वन पेन्शनगरिबांसाठी १० टक्के आरक्षणसंसदेच्या कॅन्टीनमधील भोजनाचे अनुदान संपविले