चेन्नई : कृष्णाचे नाव आले की, ओघानेच त्याच्या लीलाही समोर येतात. आता हेच पाहा श्रीकृष्णाचा हा ‘बटर बॉल’ आजही लोकांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. चेन्नईपासून ६० किमी. अंतरावर महाबलीपुरम येथे हा भव्य दगड आहे. एका उंच जागेवर ४५ अंशाच्या कोनात हा दगड स्थिर आहे. कृष्णाच्या आवडत्या लोण्याचे हा प्रतिक समजला जातो. हा दगड २० मीटर उंच आणि ५ मीटर रुंद आहे. याचे वजन आहे २५० टन. भौतिकशास्त्रातील नियम झुगारुन हा दगड एका निमूळत्या जागेवर वर्षानुवर्षापासून उभा आहे. या दगडाकडे पाहिल्यावर असे वाटते की, कोणत्याही क्षणी तो खाली कोसळेल. या दगडाचे अस्तित्व एक रहस्य बनून राहिलेले आहे. अनेक वैज्ञानिकांनीही यावर वेगवेगळे तर्क केले आहेत. काही जणांचे असे मत आहे की, हा दगड नैसर्गिकच असा आहे. पण, भूवैज्ञानिकांना हा दावा मान्य नाही. स्थानिक लोक याला देवाचा चमत्कार मानतात. दक्षिण भारतातील एका राजाने या दगडाला हटविण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो यशस्वी झाला नाही. १९०८ मध्ये तत्कालिन गव्हर्नरनेही हा दगड हटविण्यासाठी सात हत्तींची मदत घेतली होती. पण, दगड जाग्यावरुन इंचभरही हलला नाही.
श्रीकृष्णाचा बटर बॉल
By admin | Published: January 07, 2017 5:02 AM