शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

ऑफिसर फॅमिली! भाऊ-वहिनी IAS, IPS, वडील BEO, आई शिक्षिका; लेक होणार डेप्युटी कलेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 11:33 AM

कुटुंबातील, एकमेकांपासून प्रेरणा घेऊन, जवळजवळ सर्व सदस्यांना अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. या कुटुंबातील सदस्यांनी हे स्थान कसं मिळवलं आहे हे जाणून घेऊया.

देशभरात अशा अनेक कुटुंबांची चर्चा ऐकायला मिळते, ज्यांच्या कुटुंबातील अनेक जण अधिकारी असतात. छत्तीसगड राज्यातील एका कुटुंबाची अशीच गोष्ट आहे. कुटुंबातील, एकमेकांपासून प्रेरणा घेऊन, जवळजवळ सर्व सदस्यांना अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. या कुटुंबातील सदस्यांनी हे स्थान कसं मिळवलं आहे हे जाणून घेऊया.

अंबिकापूर येथील रहिवासी असलेल्या शुभम देवने छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या (CGPSC) CGPSC PCS भर्ती 2022 परीक्षेत दुसरा रँक पटकावला होता. यापूर्वी तो डेप्युटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. त्याला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जात आहे की, शुभमने त्याचा IAS भाऊ राहुल देव आणि IPS वहिनी भावना गुप्ता यांच्यापासून प्रेरणा घेऊन CGPSC PCS 2022 परीक्षेत हे स्थान प्राप्त केलं आहे.

भाऊ आणि वहिनी दोघेही IAS, IPS

शुभमचा भाऊ आणि वहिनी दोघेही 2014 च्या बॅचचे IAS आणि IPS अधिकारी आहेत. राहुल देव सध्या मुंगेली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि वहिनी IPS भावना गुप्ता बेमेटारा जिल्ह्याच्या एसपी आहेत. दुसरीकडे, शुभमचे वडील सुरगुजा जिल्ह्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर त्याची आई शिक्षिका आहे. शुभम आता डेप्युटी कलेक्टर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमने आता यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण होण्याचं ध्येय ठेवलं आहे. सध्या तो डेप्युटी कलेक्टर पदावर रुजू होणार आहेत. यापूर्वी 2021 च्या UPSC CSE परीक्षेत तो मुलाखत फेरीपर्यंत पोहोचला होता, परंतु काही संख्येतील फरकामुळे त्याची UPSC मध्ये निवड होऊ शकली नाही. पण आता तो 2023 च्या यूपीएससी प्रिलिम्स परीक्षेत पात्र ठरला आहे. आता त्याचे लक्ष यूपीएससी मुख्य परीक्षेवर आहे. शुभम आयआयटी कानपूरमधून इंजिनियरिंग ग्रॅज्युएट आहे.

CGPSC च्या या यशाने शुभम खूप खूश आहे. त्याने पुढे सांगितलं की, 2017 मध्ये IIT कानपूरमधून B.Tech केल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. 2018-19 मध्ये केलेल्या प्रयत्नात तो UPSC प्रिलिम्समध्ये पात्र होऊ शकला नाही. त्याच वेळी, 2020 च्या परीक्षेत, तो प्रिलिम आणि त्यानंतर मुख्यपर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर 2021 च्या परीक्षेत मुलाखतीला पोहोचलो पण परीक्षेत नापास झालो. शुभम UPSC CSE 2022 च्या मुख्य परीक्षेत बसला होता. पण आता पुन्हा 2023 साली 15 सप्टेंबरला मुख्य परीक्षा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी