शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

शनिपेठ दंगलीतील आरोपींची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 10:41 PM

जळगाव : शनिपेठ दंगलीतील सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींनी जामीन मिळावा, म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर न्यायालयाने तपासाधिकार्‍यांचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. तपासाधिकारी गुरुवारी खुलासा सादर करणार आहेत.

जळगाव : शनिपेठ दंगलीतील सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींनी जामीन मिळावा, म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर न्यायालयाने तपासाधिकार्‍यांचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. तपासाधिकारी गुरुवारी खुलासा सादर करणार आहेत.
शनिपेठ दंगलप्रकरणी पोलिसांनी २३ फेबु्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपी शेख दानीश शेख सत्तार (२२), शेख जफ्फार शेख शरीफ (२७), शेख अय्याज शेख शहानुद्दीन (२८), शहजाद खान सलीम खान (२०) व रेहान शेख इक्बाल (१८) सर्व रा.शनिपेठ, जळगाव यांना अटक केली होती. या पाचही आरोपींना बुधवारी दुपारच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी न्यायाधीश ए.डी. बोस यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारपक्षाकडून युक्तिवाद करतांना ॲड.फुलपगारे यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, आरोपींचे वकील ॲड.राशीद पिंजारी यांनी युक्तिवादात आरोपींना न्यायालयीन कोठडी मागितली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आधीच्या १२ जणांनाही न्यायालयीन कोठडी
शनिपेठ पोलिसांनी या गुन्‘ात सुरुवातीला अटक केलेल्या लखन सारवान, अमित धवलपुरे, आकाश मिलांदे, योगेश जोहरे, किशोर गोहीत, विशाल सोनवाल, हेमंत गोयल, सलीम खान अनिस खान, आसिफ शहा बशीर शहा, शेख जाकीर शेख रहीम, शेख नासीर शेख रशीद, अलफैज सैफुद्दीन यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने त्यांनाही दुपारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.
आरोपींचे जामिनासाठी अर्ज
या गुन्‘ातील सर्व आरोपींनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर न्यायालयाने तपासाधिकार्‍यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. तपासाधिकार्‍यांच्या खुलाश्यावर गुरुवारी कामकाज होणार आहे.