वॉशिंग्टन: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे प्रमुख आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथॉनी फाऊची यांनी भारताला लॉकडाऊनची गरज असल्याचं म्हटलं आहे.VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावलाभारतात काही दिवस लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊन केल्यास या कठीण काळात अत्यावश्यक पावलं उचलण्यास वेळ मिळेल, असं फाऊची यांनी म्हटलं. याशिवाय भारतानं लसीकणावरदेखील भर द्यायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. डॉ. अँथॉनी फाऊची यांनी इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली. भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ती सुधारण्यासाठी तत्काळ काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायबभारतातील सध्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजन, औषधं, पीपीई आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. पण यासोबतच पूर्ण देशात लॉकडाऊनदेखील गरजेचा आहे, असं म्हणत फाऊचींनी चीनचं उदाहरण दिलं. 'भारतात ६ महिने लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची संक्रमणाची साखळी खंडित करता येईल. या कालावधीचा वापर कोरोना संकटाचा सामना करण्याच्या तयारीसाठी करता येईल,' असं फाऊची यांनी सांगितलं.डॉ. फाऊची यांचे भारताला सल्ले-- लोकांचं तत्काळ लसीकरण गरजेचं. यामुळे परिस्थिती लगेचच पूर्वपदावर येणार नाही. पण ते आवश्यक आहे.- ऑक्सिजन, औषधांच्या पुरवठ्यासाठी एका आपत्कालीन गटाची स्थापना गरजेची. हा गट याबद्दल नियोजन करेल. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मदत घेता येईल.- लोकांच्या उपचारांसाठी आपत्कालीन रुग्णालय तयार करण्याची गरज. लोकांना रुग्णालयांची गरज असल्याचं टीव्हीवरील दृश्य पाहून जाणवत आहे.- सरकारनं विविध गटांना सोबत आणायला हवं. युद्ध काळात उभारली जातात, तशी फिल्ड रुग्णालयं उभारायला हवीत. - काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा. त्यामुळे कोरोना संक्रमणाची श्रृंखला तोडता येईल.
CoronaVirus Lockdown News: भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 12:01 PM