शटर तोडून केला दुकानात प्रवेश
By admin | Published: March 14, 2016 12:22 AM
एका पाठोपाठ तीन दुकानाना आग लागल्याने ती विझविण्यासाठी शटर तोडण्यात आले. फायरच्या जवानांना जीव धोक्यात घालून या आगीचा सामना केला. केमिकल्स जळाल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्घंधी पसरली होती.यावेळी अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. शेजारी असलेले शिवा डिस्ट्रीब्युटर्स या दुकानाचा थोडक्यात बचाव झाला आहे. आगीमुळे भींती तापल्याने त्यांच्या दुकानातील वायरींग जळाली होती. वेळीच ...
एका पाठोपाठ तीन दुकानाना आग लागल्याने ती विझविण्यासाठी शटर तोडण्यात आले. फायरच्या जवानांना जीव धोक्यात घालून या आगीचा सामना केला. केमिकल्स जळाल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्घंधी पसरली होती.यावेळी अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. शेजारी असलेले शिवा डिस्ट्रीब्युटर्स या दुकानाचा थोडक्यात बचाव झाला आहे. आगीमुळे भींती तापल्याने त्यांच्या दुकानातील वायरींग जळाली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी भींतीवर पाणी मारले. मालकाला येण्यास थोडाही उशिर झाला असता तर हे दुकानही जळून खाक झाले असते.या जवानांनी घेतली मेहनतमनपा अग्निशमन दलाचे सुनील मोरे, गंगाधर कोळी, नारायण तांदेलकर, रोहीदास चौधरी, नासीर अली शौकत अली,अश्विन घरटे, किशोर कोळी, देविदास सुरवाडे, पन्नालाल सोनवणे यांच्यासह जैन कंपनीचे योगेश बाफना, कैलास सैंदाणे, नितीन चौधरी, मंगेश पाटील, अमोल पाटील, चेतन गाडेलवार, तिनीन पाटील, मंगेश वंजाळे व हेमकांत पाटील आदींनी पहाटे साडे पाच वाजेपासून सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत आग विझविली.