शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

बार्शीटाकळीत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम

By admin | Published: December 18, 2014 12:40 AM

बार्शीटाकळी: येथील ग्रामीण रुग्णालयात १५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताकदिनी खास पाहुणे राहणार असून त्यांच्या भेटीला लक्ष्य ठरवून लष्कर-ए-तोयबाकडून हल्ला केला जाऊ शकतो, या गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक स्थळे, शाळा आणि मॉलसारख्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
पेशावर येथील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मध्य प्रदेशच्या कारागृहातून पाच अतिरेकी पळून गेले होते. त्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांचा लष्करच्या अतिरेक्यांशी संपर्क असून अलीकडेच लष्करच्या अतिरेक्यांचे फोन खंडित करण्यात आले असता या सर्वांवर हल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. ओबामा हे २६ जानेवारी रोजी भारतभेटीवर येत असून पळून गेलेल्या या अतिरेक्यांपैकी एक किंवा दोन जणांकडून त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता पाहता गृहमंत्रालयाने सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे.
शाळांची सुरक्षा
मजबूत करा- केंद्राचे निर्देश
देशभरातील शाळांमध्ये संरक्षण व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश केंद्राने तातडीने राज्यांना दिले आहेत. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना, राज्य सरकारांना राज्यातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविणे व अधिक भक्कम करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.
गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत दहशती हल्ल्यानंतर मुलांच्या सुटकेची योजना, ओलीस ठेवले जाण्याला प्रतिबंध घालण्याचे उपाय व संकटकाळी दरवाजे व शाळेचे मुख्य फाटक बंद करणे अशा अनेक प्रसंगांकरिता योजना आखण्यात येणार आहेत.
---------------
२०१० मध्ये गृह मंत्रालयाने शाळांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. या सूचना मुंबईतील दहशती हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक झाल्यानंतर जारी करण्यात आल्या होत्या. या सूचनांची फेरतपासणी करून विद्यमान परिस्थिती लक्षात घेता त्यात काही नव्या सूचना समाविष्ट होणार असून काही बदलही केले जाणार आहेत असे ते पुढे म्हणाले. काही शाळांना विशेष निर्देश दिले जाणार असून सुरक्षा सरावासाठी त्यांना स्थानिक पोलीस व प्रशासनासोबत समन्वय साधण्यास सांगितले जाणार आहे. दिल्ली व मुंबईतील काही मुख्य शाळा तसेच उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातील काही निवासी शाळांना विशेष सुरक्षा देण्यात येण्याची शक्यता या अधिकार्‍यांनी व्यक्त केली.