मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 12:03 PM2019-10-06T12:03:59+5:302019-10-06T12:08:12+5:30

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

siddaramaiah compared pm modi to hitler calling central government a fascist government | मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली .'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही'

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. शनिवारी (5 ऑक्टोबर) विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिटलरसोबत मोदींची तुलना केली आहे. 

'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही' असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. चिकमगळुरूतील कालसा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला सिद्धरामय्या यांनी भेट दिली. त्याचवेळी पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठीच्या पाच हजार कोटी रुपयांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

तीन महिन्यांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर केवळ एक हजार 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी फारच कमी ज्ञान असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. तसेच जनतेने भरलेला कर दरमहा सरकारजमा करत आहे. त्यामुळे तिजोरी रिकामी राहूच शकत नाही. राज्यात पूर आल्यानंतर अनेक महिन्यांनंतर सरकारला मदतकार्यासाठी केंद्राकडून निधी मिळू शकला नसल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. याआधी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील राजकिय घडामोडींमागे राज्यातील भाजपाच्या नेत्यांचाच फक्त सहभाग नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग असल्याचं म्हटलं होतं. 

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला होता. तसेच सरकारे अस्थिर करणं ही भाजपाची सवय आहे. हे असंविधानिक असून लोकांनी भाजपाचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही. जनतेने आम्हाला सर्वाधिक मतं दिली असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस आणि जदयूने मिळून 57 टक्के मतं मिळवली आहेत. तसेच भाजपाचे हे ऑपरेशन लोट्स असून आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
 

Web Title: siddaramaiah compared pm modi to hitler calling central government a fascist government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.