बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केल्यानंतर, 'गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांडात किती जणांचा मृत्यू झाला, असा सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.कर्नाटक हे गुन्हेगारांचं राज्य बनले आहे. बेंगळुरूमध्ये सर्व सामान्यांना जगणे अवघड झाले आहे, त्यामुळे राज्याला भ्रष्टाचार व गुन्हेगारीमुक्त करायला हवे, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी रविवारी काढले होते. त्याला उत्तर देताना सिद्धरामय्या यांनी २००२ मधील गोध्रा हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित केला. हरयाणात कायदा व सुव्यवस्था आहे काय? भाजप जिथे-जिथे सत्तेत आहे, त्या राज्यांत अल्पसंख्यकांना सुरक्षा पुरवली जात नाही, असेही ते म्हणाले.प्रकार राज यांचा हल्लाहिंदी व कानडी चित्रपटांतील अभिनेते प्रकाश राज यांनीही पंतप्रधानांच्या भाषणानंतर त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की,२0१४ साली प्रॉमिस (या नावाच्या टूथपेस्टचा वापर त्यांनी आश्वासनया अर्थाने केला) दाखवूनलोकांच्या चेहºयावर आनंद (स्माइल) आणण्याचा प्रयत्न केला. पणती स्माइल प्रत्यक्षात आलेलीनाहीत. (वृत्तसंस्था)
सिद्धरामय्यांची नरेंद्र मोदींवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:25 AM