साईडपीने घेतला सेवानिवृत्त उपप्राचार्याचा बळी महामार्गावरील घटना : अंगावरुन ट्रक गेल्याने चौधरी जागीच ठार
By admin | Published: August 04, 2016 7:39 PM
जळगाव: साईडपीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावर शिवकॉलनीजवळ घडली.
जळगाव: साईडपीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावर शिवकॉलनीजवळ घडली.चौधरी हे मू.जे.महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य होते. सेवानिवृत्तीनंतर ते केसीईतच विविधता संस्था संचालक म्हणून कार्यरत होते. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या पिंप्राळा येथील निवासस्थानावरुन स्विमींग व गीता पठणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.जे.४४२४) घरी जात असताना शिव कॉलनीजवळ महामार्गाला लागत असताना साईडपीवरुन दुचाकी घसरल्याने ते महामार्गाच्या दिशेने कोसळले, त्याच वेळी मागून येणार्या सिमेंट भरलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.१८ ए.ए.७८६८) त्यांना जोरदार धडक दिली. यात डाव्या बाजूचा खांदा व छातीला जबर धक्का बसला तर डोक्यालाही दुखापत झाली, त्यामुळे काही क्षणातच ते गतप्राण झाले.पंधरा मिनिटातच आला मृत्यूचा निरोपकेसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, व्ही.जे.चौधरी व डॉ.टोके हे दररोज सकाळी सहा वाजता बेंडाळे यांच्या पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर स्विमींग व त्यांनतर गीता पठण करतात.गुरुवारीही नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम झाल्यानंतर ९.१५ वाजता ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले व साडे नऊ वाजता ते अपघातात ठार झाल्याचा निरोप बेंडाळे यांना आला.कर्मचार्याने ओळखले स्टिकरवरूनमहामार्गावर अपघात झाल्याने दोन्ही बाजूंनी अर्धा कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी मू.जे.महाविद्यालयाचे लिपिक नंदू नेहते त्या मार्गावरुन जात असताना उत्सुकता म्हणून कोण आहे हे बघायला गेले असता चौधरी हे छातीवर झोपल्याच्या अवस्थेत पडले होते त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. दुचाकीवर संस्थेचे स्टिकर लावलेले होते, त्यामुळे संस्थेशी निगडित कोणीतरी व्यक्ती असावी म्हणून त्यांनी महाविद्यालयात फोन करुन दुचाकीचा क्रमांक कळवला. गर्दीत नागरिकांनी चौधरी यांना सरळ केले असता नेहते यांनी त्यांना ओळखले व तातडीने त्यांचा मुलगा हर्षल व बेंडाळे यांना अपघाताची माहिती दिली.पत्नी व मुलाचा प्रचंड आक्रोशचौधरी यांचा मृतदेह पाहून मुलगा याने घटनास्थळावरच हंबरडा फोडला तर पत्नी प्रमिला यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेवून आक्रोश केला. त्यांचा मन हेलावणारा आक्रोश पाहून चौधरी यांचे नातेवाईक व सहकार्यांनी पत्नीला तातडीने घरी पाठविले. मुलगी विभावरी ही विवाहित असून पतीसह बंगळुरु येथे वास्तव्याला आहे.