ऑनलाइन लोकमत
पंजाब, दि. 16 - भाजपाला रामराम ठोकलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने काल काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यामुळे पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात निवडणूकीची रणधुमाळी चागंलीच रंगली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपला कैकयी आणि काँग्रेसला कौसल्या म्हटले होते. सिद्धू यांच्या या विधानाचा समाचार घेताना सुखबीर सिंग बादल यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू दररोज आई बदलत असतात. सिद्धू यांच्यापेक्षा वाईट व्यक्ती असू शकत नाही, अशा शब्दांमध्ये सुखबीर सिंग बादल यांनी सिद्धू यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले
पुढे बोलताना सुखबीरसिंग बादल म्हणाले, सिद्धू सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. आता ते काँग्रेसकडून बोलत आहेत. त्यांच्या अहंकारामुळे हे घडले आहे. सिद्धू म्हणजे मानवी बॉम्ब आहे. या बॉम्बच्या स्फोटामुळे मोठे नुकसान होऊ शकते. सिद्धू यांना प्रचंड अहंकार आहे. सहा महिन्यांनंतर सिद्धू काँग्रेस पक्ष सोडून राहुल गांधींच्या विरोधात बोलतील, याची मला खात्री आहे, असे म्हणत सुखबीर सिंग बादल यांनी सिद्धू यांच्या काँग्रेस प्रवेशावर टीका केली.
ठोको ताली - नवज्योतसिंग सिद्धू यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
ही तर माझी घरवापसी - सिद्धू
दरम्यान, नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धू यांनी आपल्या विरोधकांवर चौफेर निशाणा साधला. " कुठलाही राजकीय पक्ष वाईट नाही, पण ते पक्ष चालवणारे वाईट आहेत. मी जन्मत: काँग्रेसीच होतो, माझे वडील काँग्रेसी होते, काँग्रेसकडून ते आमदारही झाले होते, त्यामुळे काल काँग्रेस पक्षाता केलेला प्रवेश ही माझी घरवापसीच आहे, असे काँग्रेमध्ये दाखल झालेले माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.