सिद्धू यांच्याकडे थकले ८ लाख रुपयांचे वीज बिल, थकीत वीज बिलाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 01:15 PM2021-07-04T13:15:13+5:302021-07-04T13:15:18+5:30

सूत्रांनी सांगितले की, पंजाबात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात सध्या सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातून सिद्धू यांनी राज्यातील वीजसमस्येबद्दल ट्वीट केले होते. त्याला शह देण्यासाठी अमरिंदर यांच्या कॅम्पने सिद्धू यांच्या वीज बिल थकबाकीचा मुद्दा समोर आणला आहे. 

Sidhu has Rs 8 lakh electricity bill, photos of overdue electricity bill go viral on social media | सिद्धू यांच्याकडे थकले ८ लाख रुपयांचे वीज बिल, थकीत वीज बिलाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल 

सिद्धू यांच्याकडे थकले ८ लाख रुपयांचे वीज बिल, थकीत वीज बिलाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल 

Next

अमृतसर : पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मागील आठ महिन्यापासून वीज बिलच भरले नसल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्याकडे ८.६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील वीजसमस्येबद्दल आवाज उठविणारे ट्विट काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्या थकीत वीज बिलाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. (Sidhu has Rs 8 lakh electricity bill, photos of overdue electricity bill go viral on social media) 

पंजाब राज्य वीज महामंडळाच्या वेबसाईटनुसार, सिद्धू यांच्या अमृतसरमधील घराचे ८,६७,५४० रुपयांचे वीज बिल थकले आहे. या महिन्यातील वीज बिल भरण्याची अंतिम तारीख २ जुलै होती. मागील आठ महिन्यापासून सिद्धू यांनी बिल भरले नसल्याचे दिसून आले आहे.
सिद्धू हे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर वीज महामंडळाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

सूत्रांनी सांगितले की, पंजाबात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात सध्या सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातून सिद्धू यांनी राज्यातील वीजसमस्येबद्दल ट्वीट केले होते. त्याला शह देण्यासाठी अमरिंदर यांच्या कॅम्पने सिद्धू यांच्या वीज बिल थकबाकीचा मुद्दा समोर आणला आहे. 

Web Title: Sidhu has Rs 8 lakh electricity bill, photos of overdue electricity bill go viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.