ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भाजपाला रामराम ठोकलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने आम आदमी पार्टीमध्ये न जाता नवीन राजकीय पक्ष स्थापन करुन पंजाबमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात निवडणूकीची रणधुमाळी चागंलीच रंगली आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी सिद्धूवर टीका केली असून नवज्योतसिंग सिद्धू हे मानवी बॉम्ब असून एक दिवस त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नसल्याची टीका केली आहे.
परंतु दिवसागणिक सिद्धूंनी आपली राजकीय भूमिका बदलली कधी आम आदमी पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर कधी काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. सिद्धू यांच्या याच भूमिकेचा सुखबीरसिंग बादल यांनी सिद्धूंचा समाचार घेतला. सत्तेसाठी सिद्धूंची धडपड सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
माजी हॉकीपटू आणि अकाली दलाचा आमदार परगतसिंग याच्या साथीने त्यांनी आवाज ए पंजाब या पक्षाची स्थापना करत आपण पंजाबच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करणार नसल्याचे राणा भीमदेवीं यांनी म्हटले होते.