शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील सुत्रधाराला भारतात आणणार; विशेष पथक रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 9:14 PM

Sidhu Moosewala Murder: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड सचिन बिश्नोईला भारतात आणण्याची तयारी झाली आहे.

Sidhu Moosewala Murder Case: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील सुत्रधार गँगस्टर सचिन बिश्नोई याला अटक करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे एक पथक अझरबैजानला पाठवण्यात आले आहे. सचिन बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा पुतण्या आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. सचिन बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून गेला होता.

दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आज रात्रीपर्यंत अझरबैजानमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. सचिन बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण करण्याचे काम सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) आणि काउंटर इंटेलिजन्स युनिटच्या दोन निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाला सोपवण्यात आले आहे.

सचिन बिश्नोई हा सिद्धू मूसवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्या अटकेने आणि प्रत्यार्पणाने मूसेवाला खून प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होतील. काही दिवसांपूर्वी सचिन बिश्नोई याला अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. आता भारतीय सुरक्षा यंत्रणा तिथे गेल्याने त्याला भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग येईल.

सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी हत्या झाली पंजाबमधील मानसा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने एका फेसबुक पोस्टमध्ये खुनाची जबाबदारी घेतली होती. या प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून मीडियाला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले होते की, त्याच्या टोळीने त्याच्या एका साथीदाराच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या केली होती. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस