शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिद्धू मुसेवाला यांची रेकी करणारा ‘केकडा’ अटकेत, फॅन बनून घेतला हाेता ऑटाेग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 8:30 AM

Sidhu Moosewala : पाेलिसांनी पंजाबमधील तरनतारनचे जगरूप सिंग रूपा व मनप्रीत मन्नू, बठिंडाचे हरकमल सिंग रानू, हरयाणातील सोनीपतचे प्रियव्रत फौजी व मनप्रीत भोलू, राजस्थानच्या सीकरचा सुभाष बानूडा या शार्प शूटर्सची ओळख पटविली आहे.

- बलवंत तक्षक 

 चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी ८ शार्पशूटर्सची ओळख पटविली आहे. त्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ हे दोघे पुण्याचे आहेत तर, हत्येपूर्वी रेकी करणाऱ्या केकडा याला अटक करण्यात आली आहे. त्याची अटक याप्रकरणात खूप महत्त्वाची मानली जात आहे.

पाेलिसांनी पंजाबमधील तरनतारनचे जगरूप सिंग रूपा व मनप्रीत मन्नू, बठिंडाचे हरकमल सिंग रानू, हरयाणातील सोनीपतचे प्रियव्रत फौजी व मनप्रीत भोलू, राजस्थानच्या सीकरचा सुभाष बानूडा या शार्प शूटर्सची ओळख पटविली आहे. हे सर्व लॉरेन्स बिश्नोई गँगचे आहेत. पोलिसांनी सांगितले की, हे सर्वजण मुसेवाला यांच्या हत्येच्या तीन दिवस आधी कोटकपुरा महामार्गावर एकत्र आले होते.

या प्रकरणात पोलिसांना आणखी काही लोकांचा संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. मुसेवाला हत्याकांडात सचिन बिश्नोई हा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानेच गाेळ्या झाडल्याचा दावा केला हाेता. पोलिसांना अशीही माहिती मिळाली आहे की, हत्येसाठी शस्त्र राजस्थानच्या जोधपूरमधून आणण्यात आले होते.

शार्पशूटर्सची ओळख पटल्यानंतर पंजाबसह तीन अन्य राज्यांचे पोलीस आता त्यांच्या शोधात आहेत. त्यांना शस्त्रे आणि वाहने उपलब्ध करून देणाऱ्या लोकांचाही पोलीस शोध घेत आहेत. पंजाब पोलिसांचा असा अंदाज आहे की, हे हल्लेखोर उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये लपलेले असू शकतात.

तिसरा संशयित पकडलामुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना पकडले आहे. दविंदर ऊर्फ काला याला हरयाणाच्या फतेहाबादमध्ये रविवारी सायंकाळी पकडले. हत्येत सहभागी दोन संशयित कालासोबत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी ३ जूनला फतेहाबादमधून दोन संशयितांना पकडले होते. त्यातील अटकेतील आरोपी मनप्रीत सिंग याच्यावर हल्लेखोरांना संबंधित वस्तू पुरविल्याचा आरोप आहे.

राहुल गांधी आज कुटुंबीयांची घेऊ शकतात भेटकाँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मंगळवारी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या गावात जाऊन भेट घेऊ शकतात. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी हे मानसा येथे जावून मुसेवाला यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करू शकतात.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवाला