'देशाच्या सुरक्षेसाठी नवज्योतसिंगला विरोध, सिद्धू पाकिस्तानचा दोस्त'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:44 AM2021-09-19T10:44:52+5:302021-09-19T10:45:56+5:30
कॅप्टन सिंग यांनी एनआयएला दिलेल्या मुलाखतीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट प्रहार केला. नवज्योतसिंग सिद्धूला जर पंबाजच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवला, तर त्यास माझा विरोध राहिल.
चंदिगड - कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली आहे. विशेष म्हणजे अरमिंदर सिंग यांनी माजी क्रिकेटर आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सिद्धू काहीही सांभाळू शकत नाहीत, मी त्यांना चांगलंच ओळखतो, ते राज्यासाठी धोकादायक ठरतील, असे सिंग यांनी म्हटले.
कॅप्टन सिंग यांनी एनआयएला दिलेल्या मुलाखतीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट प्रहार केला. नवज्योतसिंग सिद्धूला जर पंबाजच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवला, तर त्यास माझा विरोध राहिल. कारण, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, पाकिस्तानसोबत नवज्योत यांचे संबंध आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सिद्धूशी खास मैत्री आहे, तर जनरल बाजवाही सिद्धूचे मित्र आहेत, अशी घणाघातील टीका कॅप्टन सिंग यांनी सिद्धूंवर केली आहे.
#WATCH | For sake of my country, I'll oppose his (Navjot Singh Sidhu) name for CM of Punjab. It's a matter of national security. Pakistan PM Imran Khan is his friend. Sidhu has a relation with Army chief Gen Qamar Javed Bajwa: Amarinder Singh in an exclusive interview to ANI pic.twitter.com/imeuoyDxem
— ANI (@ANI) September 18, 2021
योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेईन
अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अवमान होत असल्याचे सांगितले. अमरिंदर सिंग म्हणाले, पक्षाला माझ्याबाबत शंका का होती. हे मला समजत नाही आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले की, असे वाटते की, पक्षाला माझ्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे मी सकाळीच ठरवले की, मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे. आता पक्षाला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला त्यांनी मुख्यमंत्रि बनवावे. आता भविष्यातील राजकारणाबाबत जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी निर्णय घेईन. सध्यातरी मी काँग्रेसमध्ये आहे. आता सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेईन.
सिद्धू आणि सिंग यांच्यात वाद
कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या वृत्ताला त्यांच्या मुलाने दुजोरा दिला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू होता. अखेर आता त्याचा शेवट कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याने झाला आहे. आता प्रसारमाध्यमांममध्ये येत असलेल्या वृत्तानुसार पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख सुनील जाखड, खासदार रवनीत सिंग बिट्टू आणि प्रताप सिंग बाजवा यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.