रोड रेज प्रकरणात पंजाबच्या पटियाला कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेते तथा माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रकृती खालावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कारागृहातील भोजन करण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सिद्धू यांच्या लिव्हरमध्ये इंफेक्शन -आता सिद्धू यांना कारागृहात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्पेशल डायट दिले जाणार आहे. यात हलक्या अन्नाचा समावेश असेल. सिद्धू यांना गहू, साखर, मैदा आणि इतर काही खाद्यपदार्थ चालत नाहीत. मात्र ते जांभूळ, पपई, पेरू, डबल टोन्ड दूध घेऊ शकतात. मेडिकल रिपोर्टनुसार, सिद्धू यांच्या लिव्हरमध्ये इंफेक्शन आहे. याच बरोबर त्यांचे लिव्हर फॅटी झाले आहे. यामुळेच डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. याच बरोबर, लो फॅट आणि फायबर फूड खाण्यास सांगितले आहे. न्यायालयानेही सिद्धूंना स्पेशल डायट देण्यास मंजुरी दिली आहे.आता कारागृहात मिळणार स्पेशल डायट -मिळालेल्या माहितीनुसार, आता सिद्धू यांना कारागृहात ककडी, सूप, चुकंदर, जूस आणि फायबर फूड देण्यात येईल. गव्हाची अॅलर्जी असल्याने, ते बाजरीची भाकरीही डायटमध्ये घेऊ शकतात. याच बरोबर सिद्धू यांना अधिकाधिक हंगामी फळे खाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यात टरबूज, खरबूज, खीरा, स्ट्रॉबेरीचा समावेश आहे. याशिवाय, ते टमाटे आणि लिंबूही घेऊ शकतात.
कारागृहात सामान्य कैद्यांना मिळणारं भोजन करणार नाहीत सिद्धू, मिळणार स्पेशल डायट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:45 AM