(महत्त्वाचे) सिंहस्थात सुरक्षेचा अतिरेक; जनहित याचिकेची तयारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2015 9:44 PM
(कुंभमेळ्याच्या बातम्या एकाच पानावर घ्यावा)--------------------------------------नाशिक : शनिवारच्या शाही स्नानाच्या पर्वणीकाळात पोलिसांच्या अतिरेकी नियोजनामुळे शहरातील व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे झालेले नुकसान व भाविकांच्या पायपिटीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी सोमवारी दिली.कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केलेला कोट्यवधींचा खर्चही वाया गेला. पर्वणीकाळात ...
(कुंभमेळ्याच्या बातम्या एकाच पानावर घ्यावा)--------------------------------------नाशिक : शनिवारच्या शाही स्नानाच्या पर्वणीकाळात पोलिसांच्या अतिरेकी नियोजनामुळे शहरातील व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे झालेले नुकसान व भाविकांच्या पायपिटीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण यांनी सोमवारी दिली.कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केलेला कोट्यवधींचा खर्चही वाया गेला. पर्वणीकाळात व्यावसायिकांना व्यवसायाची मोठी संधी होती. परंतु पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्याबरोबरच व्यावसायिकांना बळजबरीने व्यवहार बंद ठेवण्यास भाग पाडल्याने त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शहरातील भाविकांनाही रामकुंडाकडे जाण्यास मनाई करण्यात आली, अनेकांना १५ ते २० किलोमीटर पायपीट करायला लावल्याने त्यांचा मनस्ताप झाला. स्थानिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत त्यांची कोंडी करण्यात आली, असे चव्हाण म्हणाले.पर्वणीकाळात दूध, भाजीपाला या अत्यावश्यक सेवा देणार्यांची वाहनेही शहरात आली नाहीत. विशेष म्हणजे अमरधाम बंद करण्यात येऊन अंत्यविधीलाही अडथळे आणण्यात आले. पोलिसांच्या अतिरेकी नियोजनामुळे महापालिकेने पुरविलेल्या विविध सोयी-सुविधांचाही लाभ भाविकांना घेता आला नाही. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या रिंगरोडचाही वापर होऊ शकला नाही. एसटी महामंडळाच्या गाड्या जागच्या न हलल्याने त्यांनाही मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले. केवळ अतिरेकी नियोजनामुळे हे घडले. याविरोधात दोन दिवसांत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)