शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

डाव्यांशी आघाडीचे काँग्रेसकडून संकेत

By admin | Published: February 04, 2016 3:10 AM

प. बंगालमधील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांशी युती करण्याचा सूर आळवला असताना काँग्रेस श्रेष्ठींनीही त्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे संकेत मिळाले आहेत

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीप. बंगालमधील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांशी युती करण्याचा सूर आळवला असताना काँग्रेस श्रेष्ठींनीही त्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे संकेत मिळाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी युती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा डाव्यांशी राजकीय सामंजस्य निर्माण करण्याकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याशी असलेली वैयक्तिक जवळीक हेही त्यामागचे एक कारण मानले जाते. ममता बॅनर्जी यांची धरसोड वृत्ती पाहता डावे पक्ष हे विश्वसनीय भागीदार मानले जातात. बॅनर्जी यांनी डिसेंबरमध्ये सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची १०, जनपथला भेट घेतल्यानंतर तृणमूलशी युती करण्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही; मात्र बॅनर्जी यांनी काँग्रेससोबतची युती पुनरुज्जीवित करण्याचा विचार सोडून दिल्याचे स्पष्ट झाले. आपण कधीही युती तोडली नाही असे सांगत त्यांनी खापर काँग्रेसच्याच माथी फोडले होते. तृणमूलशी पुन्हा युती करण्याबाबत पक्षनेत्यांशी सल्लामसलत करणार असल्याचे सोनिया गांधी यांनी त्यांना त्यावेळी सांगितले होते, असे कळते. माकपचा निर्णय लवकरच...माकपच्या प्रदेश नेत्यांच्या लवकरच कोलकात्यात होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या डावपेचांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर केंद्रीय समिती १७-१८ फेब्रुवारी रोजी औपचारिक निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी काँग्रेस-डाव्यांची आघाडी तृणमूलशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. २९४ सदस्यीय प. बंगाल विधानसभेत तृणमूल-१८४, काँग्रेस- ४२, तर डाव्यांकडे ५२ आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकत भाजपने खाते उघडले होते.कोणत्याही परिस्थितीत तृणमूल काँग्रेसशी युती नको अशी मागणी करीत प. बंगाल काँग्रेसने पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढविला आहे. ममता बॅनर्जी विश्वासार्ह नसून २०१२ मध्ये युती तोडताना त्यांनी जे केले त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा प्रदेश नेत्यांनी अलीकडेच राहुल गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत दिला होता. २०११ मध्ये एकत्र विधानसभा निवडणूक लढल्यानंतर वर्षभरातच तृणमूल काँग्रेसने मनमोहनसिंग यांच्या सरकारमधून बाहेर पडत काडीमोड घेतला होता. काँग्रेसनेही प. बंगालमधील सरकारमधील सहभाग काढत जशास तसे उत्तर दिले होते. अलीकडेच माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि माकपच्या अन्य नेत्यांनी तृणमूलला धूळ चारण्यासाठी काँग्रेसला युती करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.