शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

सैन्यदलात कपातीचे संकेत

By admin | Published: March 06, 2016 3:52 AM

सैन्यदलाच्या संख्याबळात केंद्र सरकार कपात करण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भाष्यातून हे संकेत प्राप्त झाले आहेत

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली सैन्यदलाच्या संख्याबळात केंद्र सरकार कपात करण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भाष्यातून हे संकेत प्राप्त झाले आहेत. सैन्यदलाच्या खर्चात आधुनिकीकरणासाठी फारसे पैसे उपलब्ध नाहीत; मात्र वाढत चाललेल्या पगार आणि पेन्शनच्या रकमेवर भाष्य करताना संरक्षणमंत्री म्हणतात, सैन्यदलाची संख्या अधिक असण्यापेक्षा जे आहेत ते अधिक स्मार्ट कसे होतील, यावर भर देण्याची आवश्यकता आहे. संसदेत अरुण जेटलींनी २९ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी २ लाख ३0 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. शेजारी राष्ट्र चीनचा विकास दर यंदा ६.९ टक्के म्हणजे २५ वर्षांत त्यांच्या सर्वांत नीचांकी पातळीवर आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एकीकडे चीनने लाखो कामगारांची कपात चालवली आहे. मात्र संरक्षणाचे बजेट ७.६ टक्क्यांनी वाढवले आहे. ही रक्कम भारताच्या तरतुदीपेक्षा चौपट अधिक म्हणजे ८,५५,२५८ कोटी रुपयांची आहे.सैन्यदलातल्या ट्रक ड्रायव्हरला युद्धभूमीवरील आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी अनेक तासांचा सराव करावा लागतो. ते काम आता एका सिम्युलेटरच्या मदतीने करणे शक्य होते. साधनसामग्रीचीही त्यात बचत होऊ शकते.संरक्षण सिद्धतेसाठीची रक्कम काटकसरीने वापरायची असेल, तर सैन्यदलाच्या संख्याबळात कपात करणे हा एक उपाय होऊ शकतो, ज्याचे सूतोवाच संरक्षणमंत्र्यांनी केले आहे. संरक्षण बजेटमधील एवढी रक्कम आधुनिकीकरणासाठी वापरण्यास अनावश्यक खर्चांना फाटा द्यावा लागेल. अशी बचत कुठे करता येईल, याच्या जागा शोधून काढण्याचे आदेश संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. उदाहरणेच द्यायची झाली तर सैन्यदलात पूर्वी जागोजागी टेलिफोन आॅपरेटर्स असायचे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यामुळे इतक्या आॅपरेटर्सची आवश्यकता नाही.