नवी दिल्ली : येत्या २४ आॅगस्ट रोजी होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) प्राथमिक परीक्षा (प्रिलिम्स) स्थगित करण्याचा आग्रह सरकारने आयोगाला केला असल्याने ही परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेच्या आराखड्याबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकारने आयोगाकडे आग्रह केला आहे. राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससी व समितीला आम्ही आग्रह करीत आहोत की, याप्रकरणी व सर्व नागरिकांच्या समस्येवर विचार केला जावा. त्यांनी या परीक्षेला पुढे ढकलण्याबाबत विचार केला पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘यूपीएससी प्रिलिम्स’ पुढे ढकलली जाण्याची चिन्हे
By admin | Published: July 16, 2014 2:10 AM