नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचीन पायलट यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या लढाईला सुरुवात झाल्यानंतर पायलट भाजपाचे कमळ हातात घेणार याची जबरदस्त चर्चा सुरू झाली होती. मात्र, तेव्हा पायलट गटाने या चर्चांना निरर्थक असल्याचे म्हणत तत्काळ पूर्णविराम दिला होता. मात्र यादरम्यान त्यांची गेहलोतांविरोधातील नाराजी प्रकर्शाने दिसून येत राहिली. मात्र, असे असतानाच आता काँग्रेसला काही प्रमाणात शूभ संकेत मिळाले आहेत.
सचिन पायलट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर काही पोस्ट्स केल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह पुन्हा परतल्याचे दिसत आहे. त्यांनी एका पाठोफाठ एक अनेक पोस्ट केल्या आहेत. राजस्थान वाद सुरू झाल्यानंतर त्यांच्या फेसबुक पोस्ट्सवरून पक्षाचे चिन्ह गायब झाले होते. यानंतर ते भाजपात जाण्याच्या अथवा दुसरा एखादा पर्याय निवडण्याची चर्चा सुरू झाली होती.
माजी उप-मुख्यमंत्री पायलट यांनी फेसबुकवरून केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यात हाताचे चिन्ह दिसत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'सेवा आणि निष्ठेचा पर्याय आणि राष्ट्राची सुरक्षितता आणि जनतेच्या रक्षणासाठी सदैव निःस्वार्थ भावाने समर्पित असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या सर्व जवानांना तसेच देशावासीयांना केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.'
सेवा और निष्ठा के पर्याय एवं राष्ट्र की सुरक्षा और जनता की रक्षा के लिए सदैव निःस्वार्थ भाव से समर्पित केंद्रीय रिजर्व...
Posted by Sachin Pilot on Sunday, July 26, 2020
याशिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुन्यतिथी निमित्तानेही फेसबुकवर पोस्ट टाकली आहे, या दोन्ही पोस्टच्या खालच्या बाजूला काँग्रेस पक्षाचे चिन्ह 'हाथ' दिसत आहे. तर दुसरीकडे, सचिन पायलट यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी सचिन पायलट यांनी कारगील विजय दिवस आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लहिली होती. या पोस्टमधून काँग्रेसचा हात गायब झाला होता. यानंतरच ते भाजपा अथवा एकादा दुसरा पर्याय निवडण्याची शक्यता असल्यचे बोलले जात होते.
कारगिल विजय दिवस के अवसर पर 1999 के कारगिल युद्ध में अपने अदम्य साहस, अद्भुत पराक्रम एवं शौर्य से दुश्मनों को पराजित कर...
Posted by Sachin Pilot on Saturday, July 25, 2020
महत्त्वाच्या बातम्या -
भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अॅप्सवर बंदी!
आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर