गंगटोक : देशातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून सिक्कीमची निवड करण्यात आली आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांत पहिल्या दहा जिल्ह्यांत सिक्कीमच्या चार जिल्ह्यांनी स्थान पटकावले होते. ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१६’ च्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या अहवालानुसार सिक्कीमने यात १०० पैकी ९८.२ टक्के गुण मिळविले. यासाठी किती टक्के घरांमध्ये स्वच्छतागृहे आहेत याचा आधार ठरविण्यात आला होता. किती टक्के लोक घरातील स्वच्छतागृहाचा/सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करतात त्यासाठी १०० गुण ठरविण्यात आले होते. त्या निकषावर सिक्कामने १०० गुण प्राप्त केले, असे सिक्कीमने निवेदनाद्वारे जाहीर केले. पाहणीतील स्वच्छतेच्या सर्व निकषांत देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सिक्कीमच्या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
सिक्कीमच सर्वात स्वच्छ
By admin | Published: September 14, 2016 5:26 AM