शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

सिक्कीममध्ये सेंद्रिय भाज्यांचे ८० हजार टन झाले उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:02 AM

संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे.

गंगटोक : संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे. मात्र शेतक-यांच्या मालाला अधिकाधिक किंमत मिळावी यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे.सिक्कीमच्या फळबागा आणि नगदी पीक विकास विभागाचे सचिव खोर्लो भुतिया यांनी सांगितले की, आमची बांधिलकी प्रदर्शित करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी ८० हजार टन सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन केले. या भाज्या १०० टक्के रसायनमुक्त असून, १४ हजार हेक्टर क्षेत्रावर त्या पिकविण्यात आल्या. ‘मिशन आॅरगॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट’ने ईशान्य भारतात एकूण ७६ हजार ३९२ हेक्टर शेतजमीन सेंद्रिय शेतीसाठी निश्चित केली आहे.भुतिया म्हणाले की, एवढे उत्पादन होऊनही राज्याला भाजीपाल्याची स्वत:ची गरज पूर्णपणे भागविता आलेली नाही. स्वयंपूर्णतेसाठी १ हजार टन भाज्यांची तूट राहिली. मिशनची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट गाठले जाईल. त्यासाठी उरलेली शेतजमीन वापरली जाईल.पहिल्या टप्प्यात सेंद्रिय शेतीसाठी १४ हजार हेक्टर क्षेत्र वापरण्यात आले. या मिशनअंतर्गत मालाचे उत्पादनोत्तर व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या बाबी २०१८ पर्यंत पूर्ण केल्या जातील. सरकारने मिशनचे व्यवस्थित नियोजन केले आहे. मिशनमध्ये २८ संघटनांचे २४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. एकूण ४१ क्लस्टर्समध्ये विविध सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यात आली, असे ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, शेतकºयांना उत्पादित मालाची अधिकाधिक किंमत मिळावी, त्यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे. त्यासाठी इफ्कोसोबत संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. इफ्को ही देशातील सर्वात मोठी शेतकरी सहकारी संस्था आहे. सिक्कीम-इफ्को संयुक्त उपक्रमांतर्गत पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत एकात्मिक प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येईल. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन लाभ (इन्सेंटिव) दिला जात आहे. शेतकºयांना ई-व्हाऊचरच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट केले जात आहे. (वृत्तसंस्था)फळे आणि धान्येही-या वर्षात सिक्कीममध्ये १०० टन चेरी आणि १०० टन सेंद्रिय किवी फळे उत्पादित करण्यात आली. पथदर्शक प्रकल्पांतर्गत मोठी इलायची, अद्रक, हळद, हिरण्य गहू यांचेही उत्पादन घेण्यात आले.

टॅग्स :organic vegetablesसेंद्रिय भाज्या