शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

धार्मिक ध्रुवीकरणावरील मोदींचे मौन चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 2:39 AM

देशभरातील सामान्य जनतेत देशभर भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग सत्ताधारी भाजपचे समर्थक आणि सांप्रदायिक शक्ती करीत आहेत

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीदेशभरातील सामान्य जनतेत देशभर भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग सत्ताधारी भाजपचे समर्थक आणि सांप्रदायिक शक्ती करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर सोयीस्कर मौन पाळले आहे, ही बाब देशाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शरद पवार दिल्लीत शक्यतो पत्रकार घेत नाहीत. राष्ट्रवादीची भूमिका पक्ष प्रवक्तेच सांगतात. मात्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर पवार यांनी अर्थसंकल्पातील कृषीविषयक तरतुदी, आगामी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि केंद्रीय राज्यमंत्री रामशंकर कथेरियांच्या आग्य्रातील धार्मिक विद्वेष पसरवणारी वक्तव्ये यावर भूमिका मांडली. पंतप्रधानांच्या मौनावर थेट हल्ला चढवून पवारांनी भविष्यातला राजकीय पवित्रा स्पष्ट केला. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने राज्यमंत्री कथेरियांनी धार्मिक विद्वेष पसरवणारे जे भाषण केले, त्याचा निषेध केला असून, कथेरियांच्या मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टीची मागणी केली आहे. जेएनयू व अन्य विद्यापीठांत घडलेल्या चिंताजनक घटना, लातूरमधे अल्पसंख्य पोलीस निरीक्षकावर जमावाने केलेली बळजबरी हे सारे देशात जाणीवपूर्वक धार्मिक धु्रवीकरण घडवून आणण्याचे प्रयोग आहेत, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिकादेशातल्या ५ राज्यांमधे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करतांना पवार म्हणाले, पश्चिम बंगालमधे डावे पक्ष व काँग्रेसला साथ देण्याचे आमचे धोरण असून या समविचारी पक्षांशी समझोता करून आम्ही काही जागा लढवणार आहोत. आसाममधे राष्ट्रवादीचा कोणत्याही पक्षाशी समझोता नसून स्वबळावर आम्ही ८ ते १0 जागा लढवणार आहोत. केरळात आम्ही पूर्वीपासून डाव्या आघाडीत आहोत. त्या भूमिकेत बदल नाही. छगन भुजबळावर कारवाई झाली. देशात अन्य ठिकाणीही मोदी सरकार विरोधकांशी सूडबुध्दीने वागवते, असे आपणास वाटते काय, या प्रश्नावर ते उत्तरले, त्यावर लगेच भाष्य करण्याची मी घाई करणार नाही. जे लोक सरकारशी सहमत आहेत, त्यांचे मात्र बुरे दिन आलेले नाहीत, इतके म्हणता येईल.कृषी क्षेत्राबाबत भ्रामक आकडेवारीकृषी क्षेत्राविषयी काही घोषणा करून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प शेतकऱ्यासाठीच असल्याचा मुलामा चढवला. प्रत्यक्षात अर्थसंकल्पातील आकडेवारी भ्रामक व भिन्न आहे असा आरोप पवार यांनी केला. इतिहासात कृषी क्षेत्रासाठी ३५ हजार ९00 कोटींची तरतूद कोणत्याही सरकारने केली नव्हती, असे जेटली सांगत असले तरी मूलत: ही आकडेवारी चुकीची आहे, कारण शेतकऱ्यांसाठी व्याजापोटी माफ करण्यात येणाऱ्या १५ हजार कोटींच्या रकमेचा यापूर्वी बँकिंगविषयक तरतुदीत समावेश असे.ही आकडेवारी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात दाखवण्याची कलाकुसर अर्थमंत्र्यांनी केली. ती वजा केल्यास जेटलींचा दावा खोटा ठरतो, असेही पवार म्हणाले.1 यूपीए १ व २ च्या कारकीर्दीत मनरेगा योजना लागू झाली. पंतप्रधानांनी राज्यसभेत या योजनेची खिल्ली उडवताना यूपीएच्या विफलतेचा तो पुरावा असल्याचे म्हटले होते. 2 अर्थमंत्र्यांनी आता मनरेगाची तरतूद वाढवून यूपीए सरकारचे धोरण योग्यच होते यावर शिक्कामोर्तब केले आहे. 3 यूपीए सरकारने कृषीमालाचे हमी भाव सातत्याने वाढवले. त्यांना तऱ्हेतऱ्हेचे प्रोत्साहन दिले. त्यामुळेच भारत तांदूळ निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर, कापूस, साखर आणि गहू निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आला, असा दावा करून, एनडीए सरकारने मात्र दोन वर्षांत हमी भाव न वाढवल्याने कृषी उत्पादन घटत चालले आहे, अशी टीका पवारांनी केली.