स्थानिक वायदा बाजारात चांदीने आज मोठी उसळी घेतली. यामुळे चांदीचे दरांत विक्रमी वाढ झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर सकाळी नऊ वाजता 14 सप्टेंबरच्या चांदीचा दर 55423 रुपये प्रति किलोग्रॅम झाला होता.
यावेळी चांदीच्या दरांमध्ये 1418 रुपयांची वाढ झाली होती. चांदीसोबत सोन्याच्या वायदा बाजारातही वाढ नोंदविली गेली. एमसीएक्सवर पाच ऑगस्ट 2020 साठी सोन्याच्या किंमतींमध्ये 73 रुपयांची वाढ झाली. तर सोन्याचे दर पाच ऑक्टोबरसाठी 49,235 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. यावेळी सोन्याच्या दरात 77 रुपयांची वाढ नोंदविली गेली.
याशिवाय़ आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव मंगळवारी सकाळी 0.16 टक्के म्हणजेच 2.9 डॉलरनी वाढला होता. सोन्याचा दर 1820.30 डॉलर प्रति औस झाला होता. एवढेच नाही तर जागतिक बाजारात 0.93 डॉलरच्या वाढीसह सोने 1,818.70 डॉलर प्रति औस झाले होते. चांदीच्या जागतिक वायदा किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. कॉमेक्सवर चांदीच्या किंमतीत 0.49 डॉलरची वाढ झाली. चांदी आज 20.70 डॉलर प्रति औंस वर व्यापार करत होती.
दरवाढीचे कारण
जागतिक अर्थव्यवस्थेसह अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या किंमतीमध्ये अस्थिरता दिसू लागल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेसह अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा मार्ग पत्करला असून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देणारे एकमेव सोने हाच पर्याय आहे. यामुळे दिल्लीमध्ये काही दिवसांत सोन्याचा दर 51 हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सोन्यातील नफेखोरी अशीच सुरु राहिल्यास सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बुधवारी ऑगस्टमधील वायदा बाजारात सोन्याची किंमत 48,589 झाली होती. अँजेल ब्रोकिंगच्या अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोन्याची किंमत पुढील एक-दोन महिन्यांत 51000 च्या आसपास जाईल. तर मोतिलाल ओस्वालच्या किशोर नर्ने यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांत सोन्याच्या किंमती 65 ते 68000 हजारावर जाण्याची शक्यता आहे. एवढी मोठी वाढ ही भारतीय रुपया आणि डॉलरच्या किंमतीवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार
करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...
4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप
कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार
लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती
...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान
भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?
Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती