सिमी
By admin | Published: January 16, 2016 2:04 AM
फरार सिमी कार्यकर्ता जेरबंद
फरार सिमी कार्यकर्ता जेरबंदऔरंगाबाद एटीएसने आणले नागपुरात : २८ पर्यंत पोलीस कोठडी नागपूर : तब्बल तीन वर्षांपासून तपास यंत्रणांना गुंगारा देत फिरणारा कट्टर सिमी कार्यकर्ता अमान शरीफ खान याच्या मुसक्या बांधण्यात अखेर खंडवा पोलिसांनी यश मिळवले. औरंगाबाद चकमकीपासून तो फरार होता. त्याला खंडवा पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी नागपुरातील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.इंडियन मुजाहिदीनच्या संपर्कात असलेल्या सिमीच्या सशस्त्र दहशतवाद्यांसोबत तीन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये एटीएसची चकमक झाली होती. त्यावेळी एक दहशतवादी ठार झाला होता. तर, काहींना एटीएसने जिवंत पकडण्यात यश मिळवले होते. त्यानंतर या चकमकीशी संबंधित असणार्यांची धरपकड झाली. बुलडाणा येथील काही सिमी कार्यकर्त्यांची एटीएसने अटक केली होती. अमान मात्र फरार होता. तब्बल तीन वर्षे तपास यंत्रणांना गुंगारा देणारा अमान अखेर खंडवा पोलिसांच्या हाती लागला. तो मोस्ट वॉन्टेड असल्याचे आणि त्याच्यावर एटीएसने औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल केल्याचे माहीत असल्याने खंडवा पोलिसांनी त्याला औरंगाबाद एटीएसच्या हवाली केले. औरंगाबाद एटीएसने त्याला शुक्रवारी नागपुरात आणले. --प्रचंड गोपनीयताअमान याचे इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांशी थेट संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याला नागपुरात आणल्यापासून तो कोर्टात हजर करून परत नेईपर्यंत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली.--