‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 11:11 AM2024-10-07T11:11:45+5:302024-10-07T11:13:12+5:30
घरगुती बचतीमध्ये झालेली प्रचंड मोठी घट, वाढती महागाई आणि उत्पादन क्षेत्रातील अडचणी पाहता ‘मेक इन इंडिया’ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे खरगे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी भारतीय अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान तीच ती शिळी विधाने करीत असले तरी देशाच्या प्रत्येक घटकांवर नकारात्मक परिणाम करणाऱ्या अर्थव्यवस्थेला यामुळे उजाळा मिळणार नाही, असे खरगे म्हणाले.
घरगुती बचतीमध्ये झालेली प्रचंड मोठी घट, वाढती महागाई आणि उत्पादन क्षेत्रातील अडचणी पाहता ‘मेक इन इंडिया’ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे खरगे म्हणाले.
कौटुंबिक कर्जात वाढ
आर्थिक बाबींशी संबंधित वाढत्या जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक कर्जबाजारीपणात २०१३-१४ ते २०२२-२३ पर्यंत २४१ टक्के वाढ झाल्याचे खरगे म्हणाले. जीडीपीच्या अनुषंगाने कौटुंबिक कर्ज उच्चांकी म्हणजे ४० टक्के असल्याचा दावा त्यांनी केला.
खरगेंचे असे दावे...
- कौटुंबिक बचत गेल्या ५० वर्षांतील नीचांकी पातळीवर.
- कोविड-१९ नंतर कुटुंबांच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढला.
- घरच्या साध्या शाकाहारी जेवणासाठीच्या खर्चात ११ टक्के वाढ.
- भाजपने केलेली भाववाढ, असंघटित क्षेत्राचे नुकसान याला जबाबदार.