शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

पाकिस्तानच्या सिमरनला हवं भारतीय नागरिकत्व; सांगितली मुलींवरील अत्याचाराची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:32 AM

सिमरनने डीएमला सांगितले की, ती 27 सप्टेंबर 2013 रोजी तिची मावशी बरजी बाईसोबत पाकिस्तानातून भारतात आली होती. ती गेल्या दहा वर्षांपासून अलीगडमध्ये तिच्या आजी-आजोबांच्या घरी व्हिसावर राहत आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू कुटुंबांवर अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. 27 सप्टेंबर 2013 रोजी पाकिस्तानात राहणारी सिमरन तिची काकी बरजी बाईसोबत पाकिस्तानातून भारतात (यूपीमधील अलीगड) आली. त्यानंतर ती लाँग टर्म व्हिसावर तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहत आहे. तिने भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अलीगडच्या डीएमकडे अर्ज केला आहे. सिमरन वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

सिमरन नावाची मुलगी तिच्या आजोबांसोबत अलीगडचे डीएम इंद्र विक्रम सिंह यांना भेटण्यासाठी आली होती. सिमरनने डीएमला सांगितले की, ती 27 सप्टेंबर 2013 रोजी तिची मावशी बरजी बाईसोबत पाकिस्तानातून भारतात आली होती. ती गेल्या दहा वर्षांपासून अलीगडमध्ये तिच्या आजी-आजोबांच्या घरी व्हिसावर राहत आहे. सिमरनने डीएमला सांगितले की ती अलीगड मुस्लिम विद्यापीठातून बीडीएसचे शिक्षण घेत आहे. तिला भारतीय नागरिकत्व हवे आहे. सिमरने सांगितले की, तिने 2019 मध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला होता.

डीएम इंद्र विक्रम सिंह यांनी सिमरनच्या सर्व गोष्टी ऐकल्या. सिमरनला तिचे नाव उर्दूमध्ये कागदावर लिहायला लावले. याप्रकरणी डीएम सांगतात की, शहरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. याबाबत राज्य आणि केंद्र पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. सरकारच्या सूचनेच्या आधारे, तपासणी आणि आक्षेप निकाली काढल्यानंतर, भारतीय नागरिकत्व देण्यासाठी सुधारित माहिती आणि शिफारसीसह विस्तृत अहवाल पाठविला जात आहे. सिमरन आणि तिची मावशी बरजी बाई यांच्या भारतीय नागरिकत्वाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

सिमरनने सांगितले की, तिचे आई-वडील, दोन भाऊ आणि आत्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जाफराबाद येथे राहतात. त्यांनाही भारतात यायचे आहे. पाकिस्तानात हिंदू भगिनी आणि मुलींवर अत्याचार आणि अराजकतेला सामोरे जावे लागत आहे. या घटनांमुळे ती इतकी घाबरली की ती पाकिस्तानातून थेट अलीगडमध्ये तिच्या आजोबांकडे आली. भारत आणि पाकिस्तानच्या वातावरणात फरक आहे.

सिमरनचे आजोबा रमेशलाल यांनी सांगितले की, पाकिस्तानी नागरिक असल्याने तो आणि त्याचे कुटुंब एलटीव्ही म्हणजेच दीर्घकालीन व्हिसाद्वारे अलीगढमध्ये राहत होते. रमेशलाल यांनी सांगितले की, त्यांनी 2015 मध्ये पत्नी लाजवंती, मुलगा कैलाश आणि मुलगी पूजा यांच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यांचा एक मुलगा हरेशलाल सध्या बलुचिस्तानमध्ये राहतो, तर दुसरा मुलगा शंकरलाल आणि सून बरजी बाई 2013 मध्ये अलीगडला आले. त्यांनी नागरिकत्वासाठी अर्जही केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान