कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवला आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून सतर्कताही वाढली आहे. मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करत सिंगापुरमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जात असल्याचं सांगितलं. तसंच भारतात हा स्ट्रेन तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो, असंही ते म्हणाले. केजरीवालांच्या या ट्वीटला सिंगापूरच्या दुतावासानं उत्तर दिलं आहे. "सिंगापूरमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. गेल्या आठवड्यामध्ये सिंगापूरमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधिक रुग्णांमध्ये B.1.617.2 हा व्हेरिअंटचआढञळला आहे. फिलोजेनेटिक चाचणीतून हे सिद्ध झालं आहे. या विषाणूची निर्मिती ही भारतातूच झाली आहे," असं सिंगापूरच्या भारतातील दुतावासानं सिंगापूरच्या आरोग्यविभागाच्या माहितीचा हवाला देत म्हटलं. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
मुलांसाठी घातक ठरणारा 'तो' स्ट्रेन भारतातील; सिंगापूरच्या दुतावासाचं केजरीवालांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:09 AM
Coronavirus Strain In Singapore : अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमधील स्ट्रेन मुलांसाठी धोकादायक असल्याचं केलं होतं ट्वीट
ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमधील स्ट्रेन मुलांसाठी धोकादायक असल्याचं केलं होतं ट्वीटसिंगापूरच्या भारतातील दूतावासानं ट्वीट करत दिलं उत्तर