ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 30 - भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंगापूर प्रशासनाने विशेष कॅम्पेन घोषित केले आहे. याअंतर्गत आॅक्टोबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत दीपावली आणि नाताळची धूम सिंगापूरमध्ये पाहायला मिळेल. सिंहांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सिंगापूरमध्ये भारतीय पर्यटकांनी मोठ्या संख्येने सुटीच्या दिवशी सहलीसाठी यावे, हा कॅम्पेनचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, येथील लिटिल इंडिया आणि आॅर्चर्ड रोड या रस्त्यांवर दीपावली आणि नाताळनिमित्त विविध सांस्कृति उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्याचा पूरेपूर आनंद पर्यटकांना लुटता येईल. भारतीय पर्यटकांना सिंगापूरमध्ये थेट प्रवेश मिळणार असून त्यासाठी प्रशासनाने व्हिसामुक्त संक्रमण सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळेविविध उत्सवांसाठी ९६ तासांच्या व्हिसामुक्त प्रवेशाचा आनंद पर्यटकांना लुटता येईल. पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी सिंगापूरच्या लिटिल इंडिया येथील रस्ते रंगीबेरंगी दिवे आणि अनोख्या रोषणाईने उजळून निघाले आहेत. तर नाताळला येथील आॅर्चर्ड रोडवर झगमगत्या रात्रीचा नजराणा पाहता येईल.
भारतीय पर्यटकांसाठी सिंगापूरच्या पायघड्या
By admin | Published: October 30, 2016 9:10 PM