नवी दिल्ली: राजधानी दिल्लीला लागून असलेल्या सोनीपत येथील सिंघू बॉर्डर लिंचिंगमधील दलित मजूर लखबीर सिंगच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त केली आहे.
एकाने हात तर दुसऱ्याने पाय कापलापोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपत पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे आणि आरोपी सरबजीतची तलवार जप्त केली आहे. सरबजीतनेच मृताचा हात कापला होता. तर, पोलिसांनी आणखी एक आरोपी नारायण सिंगचे कपडे आणि तलवार देखील जप्त केली आहे. नारायण सिंगनेच मृताचा पाय कापला होता. याशिवाय, पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. सध्या, पोलीस आणखी काही लोकांना अटक करू शकतात.
लखबीर सिंगच्या निर्दयी हत्या प्रकरणात सोनीपत पोलिसांनी रविवारी निहंग नारायण सिंग, भगवंत सिंग आणि गोविंद प्रीत सिंग यांना न्यायालयात हजर केले होते. या दरम्यान न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. तर, निहंग सरदार नारायण सिंग, भगवंत सिंग आणि गोविंद प्रीत सिंगला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाईल.
3 आरोपींनी कोर्टात लखबीरच्या हत्येची कबुली दिली
आरोपींना पोलिसांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग किमी सिंगला यांच्या न्यायालयात हजर करताना 14 दिवसांची रिमांड मागितली, परंतु न्यायालयाने केवळ 6 दिवसांची रिमांड मंजूर केली आहे. न्यायालयात हजेरी दरम्यान तीन आरोपींनी न्यायाधीशांसमोर कबूल केले की त्यांनी लखबीर सिंग यांची हत्या केली होती. या दरम्यान, ओरापी निहंग नारायण सिंग म्हणाला की, मी पाय कापला आणि नंतर भगवंत सिंग आणि गोविंद सिंग यांनी त्याला फासावर लटकवले.