प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने पर्यावरणासाठी ते कायमच धोकादायक ठरले आहे. प्लास्टिकपासून थोडी तरी सुटका व्हावी यासाठी १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. शीतपेयांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे?- ज्या प्लास्टिक वस्तूंचा एकदाच वापर होणार असून नंतर त्या निरुपयोगी ठरणार आहे, अशांना सिंगल यूज प्लास्टिक असे संबोधले जाते.- एकाच वापरानंतर प्लास्टिक निरुपयोगी ठरत असले तरी त्याचे सहजासहजी विघटन होत नाही.- या प्रकारच्या प्लास्टिकचे रिसायकलिंगही करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढविण्यासाठी हे प्लास्टिक हातभार लावते.यांच्यावर येणार बंदी१०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक फलक, इअर बड स्टिक, बलून स्टिक, मिठाईच्या बॉक्सवर असणारे क्लिंग रॅप्स, आइस्क्रीम स्टिक, छोटे कप, स्ट्रॉ, प्लेट्स, पेले, चमचे, १२० मायक्रॉनहून कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांवरही ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली जाणार आहे.
सिंगल यूज प्लास्टिकचा कचरा (लाख टन)२०१८-१९ >> ३०.५९२०१९-२० >> ३४.००
सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांची धावपळ- सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी सॉफ्ट ड्रिंक्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सरकारला गळ घातली आहे.- या कंपन्यांचा भारतात ५१ हजार कोटींहून अधिक रुपये मूल्याचा व्यवसाय आहे.
कोणापासून किती प्लास्टिक कचरा?२४% इतर१९% चिप्स आणि इतर पाकिटे १०% बाटल्यांची झाकणे८% पेट बॉटल्स ८% कचऱ्याची पिशवी८% पॅकेजिंग साहित्य७% रिटेल बॅग्ज७% स्ट्रॉ५% फूड बॅग्ज४% क्लिंग रॅप्स