नवी दिल्ली : एका लहान मुलाच्या हत्येचा खटला सुरू असताे. सर्वाेच्च न्यायालयापर्यंत प्रकरण आलेले असते. अचानक एक मुलगा न्यायालयात येताे आणि म्हणताे, ‘जज्जसाहेब मी जिवंत आहे. मेलेलाे नाही.’ ज्याची हत्या झाली ताे मुलगा न्यायालयात उभा राहिल्यानंतर एकच खळबळ उडाली.
सुनावणीदरम्यान ११ वर्षांचा मुलगा न्यायालयात उपस्थित झाला. वडिलांनी मामा आणि आजाेबांना माझ्या हत्येच्या खाेट्या प्रकरणात फसविल्याचा त्याने दावा केला. उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथील हे प्रकरण आहे. याप्रकरणी न्यायालयाने मामा आणि आजाेबांची याचिका सुनावणीसाठी दाखल करुन घेतली आणि पुढील आदेशापर्यंत त्यांच्याविराेधात दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले असून उत्तर प्रदेश पाेलिसांना नाेटीस बजावली आहे.