शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

गणपती बाप्‍पाची प्रार्थना करत अमेरिकेतून आली बहीण; यकृत दानकरून भावाला दिले जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 10:21 PM

आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक निर्बंध असतानाही बहिणीनं पार केलं भावासाठी मोठं अंतर

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक निर्बंध असतानाही बहिणीनं पार केलं भावासाठी मोठं अंतर

नितीन जगतापमुंबई :  सूरत येथील एका व्यक्तीला लिव्‍हर सिरोसिस आजार झाला त्याला वाचविण्यासाठी एकमेव मार्ग होता तो म्हणजे यकृताचे प्रत्यारोपण करणे. भारतामध्‍ये तिसरी लाट येण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे आंतरराष्‍ट्रीय विमानप्रवासावर निर्बंध असताना बहिणीने गणपती बाप्‍पाची प्रार्थना करत अमेरिकेतून आली. तिने यकृत दानकरून भावाला जीवनदान दिले.  मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात शस्‍त्रक्रिया पार पडली. फोर्टिस हॉस्पिटलमधील लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अॅण्‍ड एचपीबी सर्जरी विभागाचे सल्‍लागार व प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्‍ता म्‍हणाले की, ''ही अनोखी केस होती. आम्‍हाला समजले की, रूग्‍णाची बहीण सुनिता गजेरा स्‍वइच्‍छेने दान करण्‍यास तयार आहे. तिची तपासणी करण्‍यात आली आणि तिचे व तिच्‍या भावाचे यकृत जुळले," 

"दात्याला प्रवास करण्‍यासाठी आणि प्रत्‍यक्षात दान करण्‍यासाठी आवश्‍यक सर्व परवानगी मिळवण्‍याची गरज होती. दाता अमेरिकन नागरिक होती आणि प्राप्‍तकर्ता भारतीय होता. तसेच सुरेशची स्थिती खूपच गंभीर होती, ज्‍यामुळे आमच्‍याकडे फक्‍त हाच एकमेव आशेचा किरण होता. आम्‍ही लॉकडाऊन व निर्बंध असताना देखील सुनिताला प्रवास करण्‍याची परवानगी मिळवून देण्‍यासाठी संघटितपणे प्रयत्‍न केले. प्रत्‍यारोपणासाठी सर्व परवानगी मिळवल्‍यानंतर सुनिता गजेराला प्रवास करण्‍याची परवानगी मिळाली आणि तिने तिच्‍या भावाला भेट म्‍हणून नवीन जीवनदान दिले," असेही ते म्हणाले. 

'आम्‍ही अनेक रुग्णालयांमध्‍ये गेलो आणि अनेक डॉक्‍टरांकडून सल्‍ला घेतला, पण त्‍यांच्‍याकडून एकच उत्तर मिळाले की, शस्‍त्रक्रिया खूपच जोखीमेची आहे. आम्‍ही डॉ. गौरव गुप्‍ता यांना भेटलो, तेव्‍हा त्‍यांनी शस्‍त्रक्रिया आणि त्‍यामधील जोखीमेबाबत सविस्‍तरपणे सांगितले. पण त्‍यांनी शस्‍त्रक्रिया यशस्‍वी देखील होऊ शकते, असा आशेचा किरण दाखवला. सर्व कर्मचारी व डॉक्‍टर्स, तसेच डॉ. स्‍वप्‍नील शर्मा यांनी खूप साह्य केले. सुरेश देवानी, रूग्‍ण  

माझा भाऊ मला खूप प्रिय आहे. त्‍याला वाचवण्‍यासाठी प्रत्‍यारोपण करणे आवश्‍यक असल्‍याचे समजल्‍यानंतर मी अधिक वाट पाहिली नाही. कोरोनामुळे  लादण्‍यात आलेल्‍या निर्बंधांमुळे परवानगी मिळवणे खूपच त्रासदायक होते, पण फोर्टिस हॉस्पिटलने मला बहुतांश कागदपत्र व्‍यवहारांमध्‍ये मदत केली. मला दृढ विश्‍वास होता की, गणपती बाप्‍पा माझी प्रार्थना ऐकतील. मी माझ्या भावाचे जीवन वाचवणा-या डॉक्‍टरांच्‍या टीमचे मन:पूर्वक आभार मानते. आज तो आरोग्‍यदायी जीवन जगत आहे. मी त्‍याला भेट म्‍हणून माझे यकृत देऊ शकले याचा मला आनंद होत आहे. आमचे नाते आता अधिक दृढ झाले आहे. सुनिता गजेरा, दाता

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतSuratसूरत