ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि.२६ - दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली नसताना त्यांच्या लहान भावने लग्नाचा विचार बोलून दाखवल्याने बहिणींनीच भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ३२ वर्षाच्या मणिगंदंनने आपल्या दोन्ही मोठ्या बहिणी महादेवी (वय ३८) व निर्मला ( ३६) यांना आपल्या लग्न करण्याचा विचार असल्याचे सांगितले असता, दोन्ही बहिणींनी त्याला समजवायचा प्रयत्न केला, त्यांच्यातील चर्चेचे वादात रुपांतर झाल्याने मणिगंदंनने रागाने घरातून निघून गेला. दुस-या दिवशी पुन्हा घरी आल्यावर त्याच विषयावर वाद उफाळून आल्यावर निर्मला व महादेवीने मणिगंदंन ऐकत नसल्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, तसेच त्याच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या मणिगंदंनने घरातून पळ काढला असता त्याच्या शेजा-यांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मणिगंदंनला डोक्यावर ४६ टाके पडले असून त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. तसेच प्रकरण पोलिसात गेल्याचे लक्षात येताच दोन्ही बहिणींनी स्वतःचा गळा कपत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना दरवाजा तोडून घरात जावे लागले. पोलिसांना निर्मला मृतावस्थेत अढळली तर, बेशूद्ध अवस्थेत अढळलेल्या महादेवीला पोलिसांनी राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच निर्मलाचे शव पोस्टमॉटर्नसाठी पाठवून दिले. मणिगंदंन व त्याच्या दोन्ही बहिणी सुशिक्षीत असून शइक्षणपूर्ण झाल्यावर मणिगंदंन एका खाजगी कंपनीत काम करून घर चालवत होता. आईच्या मृत्यूनंतर यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने ते वेगळे राहत होते. ही घटना कळताच मणिगंदंनचे वडिल घटनास्थळी दाखल झाले.