नवी दिल्ली : काळ्या पैशांच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) आता तांदूळ घोटाळ्याच्या तपासावर नियंत्रण ठेवणार आहे. इराणला निर्यात करण्यात आलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या तांदळाच्या कथित घोटाळ्याचा तपास सुरू असून आता एसआयटी त्यावर नियंत्रण ठेवणार आहे. हा तांदूळ समुद्रमार्गे मध्येच दुबईत पाठविण्यात आल्याचा आरोप आहे.डीआरआयने याबाबतची माहिती एसआयटीला दिली आहे. आता वेळोवेळी डीआरआयला याबाबतच्या तपासाची माहिती एसआयटीला द्यावी लागणार आहे.उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. बी. शाह यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी काळ्या पैशांच्या बाबत तपास करत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तांदूळ घोटाळा तपासावर आता एसआयटी नियंत्रण
By admin | Published: March 15, 2016 2:25 AM