मनी लाँडरिंगला आळा घालण्यासाठी एसआयटीने सूचविल्या उपाययोजना
By admin | Published: September 03, 2015 11:05 PM
नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या काळ्या पैशावरील विशेष तपास पथकाने (एसआयटी) मनी लाँडरिंगच्या विविध मार्गांना आळा घालण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. दीर्घ मुदतीच्या भांडवली प्राप्तीवर कर आकारणी, पार्टीसिपेटरी नोट्स आणि शेल कंपन्यांची निर्मिती, अशा काही उपाययोजनांमुळे मनी लाँडरिंगला आळा घातला जाऊ शकेल, असे एसआयटीने म्हटले आहे.
नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या काळ्या पैशावरील विशेष तपास पथकाने (एसआयटी) मनी लाँडरिंगच्या विविध मार्गांना आळा घालण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. दीर्घ मुदतीच्या भांडवली प्राप्तीवर कर आकारणी, पार्टीसिपेटरी नोट्स आणि शेल कंपन्यांची निर्मिती, अशा काही उपाययोजनांमुळे मनी लाँडरिंगला आळा घातला जाऊ शकेल, असे एसआयटीने म्हटले आहे. व्यापारावर आधारित मनी लाँडरिंगसाठी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत कारवाई करणे आणि या पैशाचा वापर मादक पदार्थांची तस्करी आणि सट्टेबाजीसारख्या बेकायदेशीर कारवायांसाठी केला जात असल्याकारणाने मोठ्या रोख रकमेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्याची शिफारस एसआयटीने गुरुवारी सवार्ेच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात केली आहे. शिक्षण क्षेत्र आणि धार्मिक संस्था व धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधून होणाऱ्या काळ्या पैशाच्या निर्मितीला आळा घालण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे. क्रिकेटच्या सट्टेबाजीमधून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशालाही आळा घातला पाहिजे, असे एसआयटीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)