शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

'म्हणे, टेस्ट ट्युबनं जन्मली सीता'; विप्लव यांच्या 'महाभारता'नंतर दिनेश शर्मांचं 'रामायण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 3:21 PM

त्रिपुरातले मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे.

नवी दिल्ली- त्रिपुरातले मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे. मथुरा येथे साजरा होत असलेल्या हिंदी पत्रकारिता दिवसाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सीतेचा जन्म मातीच्या भांड्यामध्ये झाला होता. म्हणजेच त्यावेळी टेस्ट ट्युबनं मुलांना जन्म देण्याची पद्धत प्रचलित होती. त्यामुळे सीतेचा जन्मसुद्धा टेस्ट ट्युबनं झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.रामायण काळात माता सीतेचा जन्म एका मातीच्या भांड्यात झाला होता. त्यामुळे रामायण काळापासून टेस्ट ट्युब बेबीची पद्धत अस्तित्वात होती. इतक्यावरच न थांबता महाभारत आणि रामायण काळाचा हवाला देत त्यांनी भगवान नारदमुनी पत्रकार असल्याचंही म्हटलं आहे. हिंदी पत्रकारिता दिवसाच्या निमित्तानं बोलताना ते म्हणाले, पत्रकारितेची सुरुवात आधुनिक काळात नव्हे, तर महाभारत काळापासून चालत आलेली आहे. महाभारत काळाचं ज्ञानामृत पाजताना ते म्हणाले, गुरुत्वाकर्षण शक्ती, प्लॅस्टिक सर्जरी आणि आण्विक शोध कुठे दुसरीकडे नाही, तर भारतात लागला आहे. तसेच महाभारत काळातही टेक्नॉलॉजी उपस्थित होती. त्यासाठी दिनेश शर्मा यांनी संजय आणि धृतराष्ट्राचं उदाहरण दिलं आहे.त्या काळातही लाइव्ह टेलिकास्ट होत असल्यानं हस्तिनापुरात बसून संजयनं कुरुक्षेत्रात होत असलेलं महाभारतातलं युद्ध पाहिलं आणि त्याचा इतिवृत्तांत धृतराष्ट्र महाराजांना कथन केला. तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी महाभारत काळातही इंटरनेट आणि उपग्रह होते, असा चमत्कारिक दावा करून चर्चेत आले होते. एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानं करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी मिस वर्ल्डमधल्या इंडियन ब्यूटीवरूनही वादग्रस्त विधान केलं होतं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश