नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गंगा नदी स्वच्छ करण्याच्या मुद्द्यावर गुरुवारी तीव्र नापसंती व्यक्त करून परिस्थिती अतिशय वाईट असून ही नदी स्वच्छ करण्यासाठी क्वचितच काही परिणामकारक काम झाले आहे, असे म्हटले आहे.लवादाचे अध्यक्ष व न्या. आदर्श गोयल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, गंगा स्वच्छ करण्याचे प्रत्यक्ष काम झाल्याचे अधिकाऱ्यांचे कितीही दावे असले तरी ते पुरेसे नाही व परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी नियमित देखरेख आवश्यक आहे. गंगेतील प्रदूषणाबाबत सामान्य माणसाला प्रत्यक्ष काय वाटते हे जाणून घेण्यासाठी पाहणी करण्याचा आदेश लवादाने दिला असून संबंधित अधिकाºयांना ई-मेलद्वारे त्याची माहिती देण्यास सांगितले आहे.नदीची संरक्षण यंत्रणा बळकट व परिणामकारक करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले आहे. गंगा नदी गोमुख व उन्नाव दरम्यान स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश व उत्तराखंड सरकारने जी पावले उचलली होती त्याचा अनुपालन अहवाल न भरल्याबद्दल याआधी लवादाने राष्ट्रीय गंगा स्वच्छता मोहिमेला फटकारले होते. लवादाने आपल्या सविस्तर निर्णयात गंगा स्वच्छ करण्यासाठी मार्गदर्शन केले होते.>कोट्यवधी खर्चूनही प्रश्न कायमहरिद्वार आणि उन्नाव दरम्यान नदीच्या काठापासून १०० मीटर अंतर विकास प्रतिबंधित क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) म्हणून जाहीर करा आणि नदीपासून ५०० मीटर्सपर्यंत कचरा टाकण्यास मनाई करण्यास सांगितले होते. सरकारने गंगा स्वच्छ करण्यासाठी दोन वर्षांत सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही ही नदी अजूनही गंभीर पर्यावरण विषय बनलेला आहे, असे लवादाने म्हटले.
गंगा नदीच्या स्वच्छतेची स्थिती अतिशय वाईट, हरित लवादाची नापसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 3:31 AM