- शीलेश शर्मानवी दिल्ली : काश्मीरमधील परिस्थिती खूपच खराब आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जम्मू-काश्मिरात जे काही घडत आहे त्याची माहिती सरकारने पारदर्शकपणे देशाला द्यायला हवी.राहुल गांधी म्हणाले की, अशी माहिती मिळत आहे की, काश्मिरातील परिस्थिती ठीक नाहीय. यावर चर्चा करण्यासाठी मला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलविण्यात आले. काश्मीरवर चर्चा करण्यात आली आणि जी माहिती मिळाली आहे.त्यानुसार जम्मू-काश्मिरात परिस्थिती खूपच खराब आहे. पंतप्रधानांनी हे स्पष्ट करावे की, केंद्रशासित प्रदेशात वस्तुस्थिती काय आहे. विशेष म्हणजे कार्यकारिणीच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला राहुल गांधी हजर नव्हते. ते अचानक ९.३० च्या सुमारास आले आणि एक तास थांबल्यानंतर बाहेर पडल्यावर काश्मीरवर हे भाष्य केले.
काश्मीरमधील परिस्थिती खूपच बिकट - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 3:52 AM