अहमदाबाद- इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती फार चांगली असल्याचं विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केलं आहे. काँग्रेस हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच मतभेद निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोपही विजय रुपाणी यांनी केला आहे. राज्य वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.देशातील व्होट बँकेचं राजकारण आता संपलं पाहिजे, असंही रुपाणी म्हणाले आहेत. सच्चर समितीच्या रिपोर्टचा हवाला देत रुपाणी म्हणाले, भाजपाशासित गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेच चांगली आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 666 कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा केली आहे.
गुजरातमध्ये भाजपानं सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. मंगळवारी (26 डिसेंबर) विजय रुपाणी यांनी गांधीनगर येथे दुस-यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुजरातमधील भाजपा सरकारचा शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहीत भाजपा व ‘रालोआ’ घटकपक्षांचे 18 मुख्यमंत्री उपस्थित होते. रुपाणी यांच्या नवीन मंत्रिमंडळात जुन्या तसंच नवीन चेह-यांसहीत 20 जणांना संधी देण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी यांनी शपथ घेतली आहे. रुपाणी यांनी दुस-यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 2006-2012 या कालावधीदरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते.