चेन्नई : नोकरी नसलेल्या व घर सांभाळणाऱ्या राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये घरभत्ता देण्याची घोषणा अण्णा द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री ई. के. पलानीसामी यांनी मंगळवारी केली. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला वर्षाला सहा गॅसचे सिलिंडर मोफत दिले जातील, असेही आश्वासन त्यांनी राज्यातील जनतेला दिले आहे.
द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी महिलांना दरमहा एक हजार रुपये घरभत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यावर पलानीसामी म्हणाले की, स्टॅलिन यांनी आमच्या जाहीरनाम्यातील काही बाबी चोरण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट अभिनेते कमल हासन यांनीही महिलांना दरमहा एक हजार रुपये घरभत्त्याची घोषणा केली होती. पलानीसामी यांनी तर आता वर्षाला मोफत सहा सिलिंडरचीही घोषणा दिली आहे.अभिनेते विजयकांत यांनी आपला पक्ष यापुढे अण्णा द्रमुकच्या आघाडीत राहणार नाही, असे आज जाहीर केले. अण्णा द्रमुकने पुरेशा जागा न सोडल्याने डीएमडीकेने हा निर्णय घेतला आहे.
याचिका फेटाळलीनवी दिल्ली : प. बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तसेच प्रचारात भाजप व त्यांच्या नेत्यांना जय श्रीराम घोषणा देण्यास रोखण्याची विनंती करणारी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए.एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या पीठाने सुनावणीनंतर ही याचिका फेटाळून लावली.