ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - दिल्लीत एफआयसीसीआयच्या इमारतीमध्ये असलेले नॅचरल हिस्ट्रीचे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय सोमवारीमध्यरात्री भीषण आगीमध्ये जळून खाक झाले. रात्री पावणेदोनच्या सुमारास इथे भीषण आग भडकली. येथे लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झाले.
त्यांना राम मनोहर लोहीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. अग्निशमन दलाच्या ४० गाडयांनी मिळून सकाळी आठच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळाले.आग कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर प्रथम आग भडकली असे पोलिसांनी सांगितले.
दिल्लीत तानसेन रोडवर एफआयसीसीआयची ही इमारत आहे. इमारतीची आग रोखणारी यंत्रणा नादुरुस्त होती, तरीही आम्ही दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवले असे अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश पानवार यांनी सांगितले.
Natural History Museum(Delhi)fire: Flames still billow out from building's top floor six hours after fire broke out pic.twitter.com/EvYwgXveOd— ANI (@ANI_news) April 26, 2016