आदर्श नगरातील सहा घरे पाण्यात भिंत फोडून काढले पाणी : रात्रभर जागरण, कमरेपर्यंत पाण्याने उडविली झोप
By admin | Published: June 25, 2016 11:04 PM
जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली.
जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली. आदर्श नगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये सहा घरे आहेत. शुक्रवारी रात्री पाऊस सुरु झाल्यानंतर या भागाच्या वरील परिसरातील पाण्याचा प्रवाह येथे आल्याने व त्यात नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात पाणी जमा झाले. त्यानंतर पाण्याला जायला जागा नसल्याने हे पाणी थेट या सहा घरांच्या कुंपणामध्ये व त्यानंतर ते सहाही घरांमध्ये शिरले. कंुपणामध्ये कमरेपर्यंत पाणी जमा झाल्याने पाणी काढावे कसे असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला. त्यात घरातही पाण्याची पातळी वाढू लागल्याने अखेर प्रताप चव्हाण यांनी कुंपणाच्या बाहेर जाऊन भिंतीला छिद्र पाडले व पाणी वाहते केले. त्यानंतर घरातील पाणी काढण्यासाठी रात्री एक वाजेपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत रहिवाशांना जागरण करावे लागले. आदर्श नगरातील साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांच्या घरामध्ये पाणी शिरले. या सहाही घरांमधील सोफा, फर्निचर व इतर साहित्य पाण्यात सापडून ओले झाले तसेच कोणाची पाण्याची मोटार, छोटी चक्की यांचेही नुकसान झाले. रात्री नगरसेवक पृथ्वीराज चव्हाण हे तेथे थांबून होते. या भागातही फटका....-समतानगरमध्ये एका घरात पाणी शिरल्याने घरात चिखलही साचला होता. - इच्छादेवी मंदिरात शिरले पाणी- प्रेमनगरात वीज तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित- बजरंग पूल पाण्याखाली- श्रीधर नगर जवळील नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने वाघ नगरचा पहाटेपर्यंत संपर्क तुटला -बजरंग पूल ते एसएमआयटी महाविद्यालय परिसराचाही पहाटेपर्यंत संपर्क तुटला.