भिलाई : सेलच्या भिलाई येथील पोलाद प्रकल्पात गुरुवारी विषारी वायूची गळती होऊन दोन उपमहाव्यवस्थापकांसह सहा जण ठार झाले. या घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील या प्रकल्पातून कार्बन मोनॉक्साईडची गळती झाल्याने अन्य ३६ जण आजारी पडले आहेत. उपमहाव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकास वर्मा या कंत्राटी कामगाराचा मृतदेह पंप हाऊस भागात आढळून आला.सेलचे अध्यक्ष सी. एस. वर्मा यांनी शुक्रवारी सकाळी या प्रकल्पाला भेट दिली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असून झळ बसलेल्या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. आजारी पडलेल्यांपैकी २१ जणांना प्रथेमोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. नऊ जण निगराणीखाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सेलने एका निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
भिलाईच्या वायूगळतीत सहा ठार
By admin | Published: June 14, 2014 3:24 AM